जाणून घ्या मार्गशीर्षातील पहिला व शेवटचा गुरुवार कधी? 

मार्गशीर्ष गुरुवार २०२३ – २४ तारखा (Margshirsha Guruvar 2023-24) यंदा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार १४ डिसेंबर, दुसरा गुरुवार २१, तिसरा गुरुवार २८ डिसेंबर आणि चौथा गुरुवार ४ जानेवारी रोजी आहे. २८ डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून येत आहे.

 जाणून घ्या मार्गशीर्षातील पहिला व शेवटचा गुरुवार कधी? 

मार्गशीर्ष गुरुवार २०२३ – २४ तारखा 
यंदा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार १४ डिसेंबर, दुसरा गुरुवार २१, तिसरा गुरुवार २८ डिसेंबर आणि चौथा गुरुवार ४ जानेवारी रोजी आहे. २८ डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून येत आहे.

मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व Margashirsha
आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची? (Puja Vidhi)
मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवू शकता.

आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

हे ही वाचा:

जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version