जाणून घ्या का साजरा केला जातो ‘बॉयफ्रेंड डे’ तसेच त्याचा इतिहास आणि महत्त्व

ह्या दिवसाची सुरुवात २०१४ मध्ये इंटरनेटवर झाली परंतु मार्च २०१६ मध्ये इंटरनेटच्या मदतीने हजारो ट्विट केले गेले.

जाणून घ्या का साजरा केला जातो ‘बॉयफ्रेंड डे’ तसेच त्याचा इतिहास आणि महत्त्व

आपण राहत असलेल्या जगात सर्व नातेसंबंधांचे स्वतःचे असे एक महत्त्व आहे. म्हणूनच जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे दिवस साजरे करून वेळोवेळी त्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. फ्रेंडशिप डे (Friendship Day), सिस्टर्स डे (Sisters Day), तसेच मदर्स डे (Mother’s Day) असे अनेक दिवस आपण साजरे करतो आणि त्या नात्याला आदर किंवा महत्त्व देण्याचा प्रयत्न करतो. पण एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराबरोबर असणारे आपले नाते ‘बॉयफ्रेंड डे’ (National Boyfriends Day)च्या माध्यमातून देखील साजरे करू शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे.

राष्ट्रीय बॉयफ्रेंड दिवस दरवर्षी ३ ऑक्टोबर (October) रोजी साजरा केला जातो. या दिवशी मुली आपल्या प्रियकराचा, तर स्त्रिया आपल्या पतीचा आदर करतात. या दिवशी त्यांना जाणीव करून दिली जाते की ते त्यांच्या जीवनात खूप महत्वाचे आहेत.

कधी सुरू झाला ‘बॉयफ्रेंड डे’?

हा दिवस कोणत्याही मुलासाठी खूप खास असतो कारण या दिवशी त्याला कळते की त्याची प्रेयसी किंवा पत्नी त्याला किती ओळखते आणि त्याच्यावर किती प्रेम करते. तसेच एखाद्या प्रियकराचे त्याच्या प्रेयसीच्या किंवा पत्नीच्या आयुष्यातील त्याचे महत्त्व पटवून देणारा हा एक महत्त्वाचा दिवस आहे.

ह्या दिवसाची सुरुवात २०१४ मध्ये इंटरनेटवर झाली परंतु मार्च २०१६ मध्ये इंटरनेटच्या मदतीने हजारो ट्विट केले गेले आणि तेव्हापासून दरवर्षी बॉयफ्रेंड डे साजरा केला जाऊ लागला. हा दिवस पूर्णपणे इंटरनेटमुळे अस्तित्वात आला आहे.

हे ही वाचा:

१०८MP कॅमेरा आणि ६GB RAM सह Moto G72 झाला भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Medicine : औषध खरे की बनावट? ग्राहकांना QR कोड स्कॅन करून मिळणार माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version