सेल्फी घेताना कोलकात्यातील मुलीच्या ड्रेसला लागली आग, पोलिसांच्या त्वरीत कारवाईने वाचला जीव

तिच्या ड्रेसला मेणबत्तीमुळे आग लागली तेव्हा ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होती, असे पोलिसांनी सांगितले.

सेल्फी घेताना कोलकात्यातील मुलीच्या ड्रेसला लागली आग, पोलिसांच्या त्वरीत कारवाईने वाचला जीव

ख्रिसमसच्या दिवशी एका दुर्दैवी घटनेत, कोलकाता येथील कसबा परिसरातील एका चर्चमध्ये सेल्फी काढत असताना एका १० वर्षीय मुलीच्या ड्रेसला मेणबत्तीमुळे आग लागल्याने तिला गंभीर दुखापत झाली. रविवारी रात्री ही मुलगी टागोर पार्क क्षेत्रातील एका चर्चमध्ये असताना ही घटना घडली. तिच्या ड्रेसला मेणबत्तीमुळे आग लागली तेव्हा ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होती, असे पोलिसांनी सांगितले. ही मुलगी तिच्या वयाच्या काही मुलांसोबत खेळत असताना हि घटना घडली.

या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात चर्चमध्ये ड्युटीवर असलेला एक पोलीस अधिकारीही जखमी झाला. उपनिरीक्षक बिमल प्रामानिक यांच्यासह स्वयंसेवक पुलिन दास यांनी हात आणि लोकरीचे कपडे वापरून आग विझवली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा चर्चमध्ये येशूची प्रार्थना सुरू होती आणि लोकांच्या लक्षात आले नाही की मुलगी ओरडत आहे. मुलीला माणिकटाला परिसरातील ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या उजव्या मांडीला आणि हाताला २० टक्के भाजले आहे.

ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये मोठी गर्दी झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून चर्चमध्ये लोकांना प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. या घटनेमुळे चर्चमधील उपासकांमध्ये घबराट पसरली. रिपोर्ट्सनुसार, कोलकाता पोलीस मुलीला वाचवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना बक्षीस देण्याची योजना आखत आहे.

हे ही वाचा:

कोरोनानंतर आता Brain-eating amoeba जगभरात केला कहर! दक्षिण कोरियामध्ये ‘ब्रेन-इटिंग अमीबा’शी संबंधित पहिल्या मृत्यूची नोंद

Gandhi Godse Ek Yudh सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट; नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version