spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lata Mangeshkar : लता दीदींच्या जयंतीच्या दिवशी मोदींनी दिली अनोखी भेट

भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती. कित्येक दशकं त्यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आजही

भारतरत्न लता मंगेशकर यांची आज जयंती. कित्येक दशकं त्यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. या ७० हून अधिक वर्षांच्या संगीत कारकिर्दीत त्यांना अनेक माणसं भेटली आहेत. आज त्यांच्या जयंतीनिम्मित भाताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन केले आहे. याचपार्श्वभूमीवर आज अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव दिले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असणार आहेत.

 महान गायिका लता मंगेशकर यांना त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील एका मोठ्या चौकात १४ टन आणि ४० फूट वीणा पुतळा बसवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आज या चौकाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची जयंती आहे. यासोबतच राम कथा उद्यानात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याप्रसंगी थोर संत महंत व लोकप्रतिनिधींनाही जिल्हा प्रशासनाकडून निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर यांच्या जयंती दिनी अभिवादनपर ट्विट केले आहे, लतादीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मला खूप काही आठवतंय…असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली आहे.

लता मंगेशकर यांचा जन्म इंदोरमध्ये झाला होता. २८ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म इंदोर येथील शिख गल्लीमधील एका चाळीमध्ये झाला. लतादीदी सात वर्षांपर्यंत तिथेच वास्तव्यास होत्या. त्यानंतर मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात आलं. लता मंगेशकर यांनी जगातील ३६ भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाची जादू रसिकांच्या मनावर होती आणि यापुढेही कायम राहील.

हे ही वाचा:

Deepika Padukone : बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोण लढते ‘या’ गंभीर आजाराशी

संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची पक्ष प्रमुखांना तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss