ट्विटर यूजर्ससाठी लॉन्च करणार लॉन्च ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज

बहुचर्चित सोशल मीडिया अ‍ॅप ट्विटर त्यांच्या यूजर्ससाठी ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज लॉन्च करणार आहे. सोमवारी दि. १२ डिसेंबर रोजी ही सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर यूजर्सला पैसे देऊन ब्ल्यू टीक मिळेल. त्याचसोबत या यूजर्संना कंटेंट एडिटसोबत अन्य सुविधाही उपलब्ध होतील.

ट्विटर यूजर्ससाठी लॉन्च करणार लॉन्च ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज

Twitter : बहुचर्चित सोशल मीडिया अ‍ॅप ट्विटर त्यांच्या यूजर्ससाठी ब्ल्यू टिक सब्सक्रिप्शन पॅकेज लॉन्च करणार आहे. सोमवारी दि. १२ डिसेंबर रोजी ही सर्व्हिस लॉन्च झाल्यानंतर यूजर्सला पैसे देऊन ब्ल्यू टीक मिळेल. त्याचसोबत या यूजर्संना कंटेंट एडिटसोबत अन्य सुविधाही उपलब्ध होतील. मात्र Apple Ios यूजर्ससाठी ही सुविधा महाग असेल. १२ डिसेंबर म्हणजे आजच ही सुविधा Twitter कडून लॉन्च करण्यात येणार आहे.

इलॉन मस्क यांनी मागील महिन्यात कंपनी टेकओव्हर केली होती. त्यानंतर सातत्याने ट्विटरमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यात ट्विटर सब्सक्रिप्शनसाठी महिन्याला ८ डॉलर शुल्क आकारले जात आहे. पैसे देऊन ब्ल्यू टिक अनेक बनावट खात्यांनाही दिले गेले. त्यामुळे त्यांच्या अकाऊंटवरील चुकीचे ट्विटही कंपनीचे मानले गेले. अनेक कंपन्यांना त्यामुळे नुकसान सहन करावे लागले. ते पाहता कंपनीला ब्ल्यू सब्सक्रिप्शन फिचर थांबवायला लागले. आता पुन्हा नव्याने ट्विटर हे फिचर लॉन्च करत आहेत.

दरम्यान ट्विटर पुन्हा एकदा आपल्या यूजर्ससाठी ब्लू सब्सक्रिप्शन (Blue Subscription) पॅकेज लॉन्च करणार आहे. ही सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर युजर्स पैसे भरून ब्लू टिक (Twitter Blue Tick) मिळवू शकतील. यासोबतच कंटेंट एडिट व्यतिरिक्त त्यांना इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत. मात्र, अॅपल आयओएस वापरकर्त्यांसाठी ही सेवा महागणार आहे. हे पॅकेज ८ डॉलर प्रति महिना तर आयफोनसाठी ११ डॉलर प्रति महिना असेल. ट्विटरकडून यूजर्सच्या अकाऊंटबाबत आढावा घेतला जाईल. केवळ व्हेरिफाईड फोन नंबर असणाऱ्यांनाच ही सुविधा मिळेल. त्यासाठी ट्विटरचे कर्मचारी तुमच्या अकाऊंटची पडताळणी करतील. व्हेरिफिकेशननंतर यूजर्सला ब्ल्यू टिक दिला जाईल. त्यांना आपल्या ट्विटसमधील कंटेन्ट एडिट करण्याचा अधिकारही मिळू शकेल. परंतु हा कालावधी ३० मिनिटांचा असेल. ट्विट केल्यापासून ३० मिनिटांच्या आत तुम्हाला एडिट करता येईल. १०८० पी व्हिडिओही अपलोड करू शकाल. शब्दांची मर्यादाही वाढवली असून मोठे ट्विट करू शकणार आहेत. सब्सक्रिप्शन घेतलेल्या यूजर्संना प्राधान्य मिळेल आणि सामान्य यूजर्सच्या तुलनेत ब्ल्यू टिक यूजर्संना ५० टक्के कमी जाहिराती दाखवल्या जातील.

विशेष म्हणजे, जर कुठल्याही यूजर्सने त्यांच्या प्रोफाईलवरील नाव अथवा फोटो बदलल्यास त्यांचे ब्ल्यू टिक हटवले जाईल. त्यानंतर व्हेरिफिकेशन करून ब्ल्यू टिक दिला जाईल. कंपनी अशा यूजर्सवर सक्ती करण्यासाठी काही फिचर लॉन्च करणार आहे. जे एखादं विशिष्ट कॅम्पेन किंवा विरोधासाठी प्रोफाईल फोटो अथवा नाव बदलतात. बहुतांश ट्विटर अकाऊंटनं माहिती देताना सांगितले की, सब्सक्राइबर त्यांचे हँडल, डिस्प्ले नाव आणि प्रोफाईल फोटो बदलू शकतात परंतु जर त्यांनी असे केले तर तात्पुरते त्यांचे ब्ल्यू टिक हटवले जाईल. त्यानंतर त्यांचे अकाऊंट पुन्हा व्हेरिफिकेशन करून ब्ल्यू टिक दिला जाईल.

ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. अधिकृत तसेच सरकारी ट्विटर अकाऊंटसाठी राखाडी रंगाचा (Grey) ऑफिशियल टॅग (Official Tag) देण्यात येईल. कंपनी किंवा ग्रुपच्या अकाऊंटसाठी ट्विटर अकाऊंटसाठी सोनेरी रंगाची टिक (Golden Tick) देण्यात येईल. ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा आठ डॉलर शुल्क आकारण्यात येईल.

 

हे ही वाचा : 

Urfi Javed उर्फी जावेद साखळीच्या ड्रेस मुळे पुन्हा एकदा झाली ट्रोल

Circus चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंगसह जॅकलिन फर्नांडिस ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version