नेते-अभिनेते लावतात हजेरी, जाणून घ्या नक्की कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?

बागेश्वर धाम महाराज अर्थातच धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे भारतात लाखो चाहते आणि भक्त आहेत.

नेते-अभिनेते लावतात हजेरी, जाणून घ्या नक्की कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?

सध्या सोशल मीडियावर बागेश्वर धाम महाराजांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे या व्हिडिओंमध्ये दिसणारे चमत्कार चर्चेचा विषय बनले आहेत. त्याचे चमत्कार पाहून आणि ऐकून लोकांवर विश्वासच बसत नाही की असे कसे होऊ शकते की कोणी कोणाबद्दल इतके कसे सांगू शकेल? बागेश्वर धाम महाराज अर्थातच धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे भारतात लाखो चाहते आणि भक्त आहेत. एवढेच नाही तर परदेशातही त्याची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे.

महाराज धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांच्या रामकथा आणि दिव्य दरबारामुळे ते चर्चेत असतात. इतकेच नव्हे तर अनेकवेळा त्यांचे नाव वादग्रस्त विधानांमुळे समोर आले आहे. आजोबांप्रमाणे त्यांनी छतरपूरच्या गाडा गावात बालाजी हनुमा मंदिराजवळ दिव्य दरबार उभारण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. त्यांचे आजोबा विद्वान होते आणि निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे चाहते त्यांच्या दरबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री रात्रीही दरबार उभारत असतात.

बागेश्वर धाम महाराजांच्या दरबारात शेकडो लोकांची गर्दी जमते. त्यांचे प्रशंसक सांगतात की पंडित धीरेंद्र शास्त्री ज्या कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपल्या दरबारात बोलावतात, जोपर्यंत ती व्यक्ती त्यांच्या जवळ पोहोचते, पंडित महाराज एका कागदावर त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहितात. लोकांना आश्‍चर्य वाटतं की एवढ्या लांबून कोणी आलेलं असताना, ज्याच्याबद्दल पंडितजींना काहीच माहिती नाही, त्याच्याबद्दल कसं सांगू शकतात? एवढंच नाही तर पंडित धीरेंद्र कृष्ण महाराज त्या व्यक्तीच्या समस्या दरबारातच सांगतात आणि त्याचं आयुष्य कसं व्यतीत झालं तेही सांगतात. महाराज त्यांच्या चाहत्यांच्या समस्यांवर उपायही सांगतात. बागेश्वर धाम महाराजांच्या दरबारात दररोज शेकडो लोक पोहोचतात. त्यांना भेटण्यासाठी देश-विदेशातूनही भाविक येत असतात.

हे ही वाचा:

चंद्रशेखर बावनकुळेंचा खळबळजनक खुलासा म्हणाले भाजपा नेतेच करतायत पंकजा मुंडेंना बदनाम

ठाकरे गटासह विरोधकांना मोठा धक्का, परभणीतील ४० सरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version