नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी tick tock या दिनाचा रंजक इतिहास घ्या जाणून

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी tick tock या दिनाचा रंजक इतिहास घ्या जाणून

tick tock day 2022 : आज २९ डिसेंबर २०२२ रोजी टिक टोक (tick tock day 2022) दिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस मावळत्या वर्षाची आठवण करून देणारा असा दिवस आहे. आज टिक टॉक डे (Tick tock Day) जगभरात साजरा करण्यात येत आहे. तुम्हाला माहित आहे का ? टिक टॉक दिन कधी पासून चालू झाला आहे ? तसेच तुम्हाला या संदर्भात बरेच प्रश्न पडत असतील. मग जाणून घेऊया टिक टोकचा रंजक इतिहास.

प्रत्येक गोष्टी मागे किंवा कोणत्याही सणामागे काहींना काही कारणे असतात. तसेच टिक टॉक (tick tock ) दिनाच्या दोन कथा सांगितल्या गेल्या आहेत. एका कथेत असे सांगितले जाते की, दोन मित्र असतात जे मद्यपान न करता नवीन वर्ष साजरा करण्यासाठी बाहेर जाण्याचा आणि पार्टी करण्यासाठी पर्याय शोधत होते त्या दोघांनी या सुट्टीचा शोध लावला. वर्षाचे शेवटचे काही तास घड्याळात नवीन वर्षाची मोजणी पाहण्यासाठी त्यांनी रात्री १२ नंतरचा अलार्म सेट (alarm Set) करण्याचा निर्णय घेतला होता.

 

अमेरिकन व्हॉईस (American Voice) अभिनेता थॉमस रॉय (Thomas Roy) यांची पत्नी रुथ रॉय (Ruth Roy) या दोघांना दुसर्‍या कथेचे क्रेडिट्स दिले जाते. कारण नवीन वर्ष पूर्ण होण्याआधीच लोकांनी आपले अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून घ्यावे या गोष्टीची सुरुवात त्यांनी केली होती.

टिक टोक डे हा दिवस आयुष्यात वेळेचे काय महत्व आहे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी २९ डिसेंबर (December) रोजी, या दिवशी अनेक लोक एकत्र येतात आणि प्रत्येक क्षण किती किमती आहे आणि याचा वापर कसा करतात येईल हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. टिक टोक डे (Tick Tock Day) हा दिवस आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे.

तुम्हाला देखील हा दिवस साजरा करायचा आहे. तर त्याची सुरुवात तुम्ही छोटया गोष्टी पासून करू शकता. जसे की तुमचे घड्याळ एका मिनिटाने पुढे ठेवणे. आणि बदलत्या वेळे कडे नीट काळजीपूर्वक पाहणे. आणि वेळेचा आनंद घेणे. काही वेळेसाठी टिक टॉकच्या आवाजाचा आनंद घ्या. टिक टोक डे (Tick Tock Day) हा खरतर नवीन वर्षाचे स्वागत (Welcome to the new year) करण्यासाठी साजरा केला जातो.

 

Exit mobile version