Lokmanya Tilak Jayanti: लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त करुया अभिवादन !

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी भीमगर्जना करणारे थोर पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी, निर्भीड वक्ता, प्रखर राष्ट्रवादी असणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज (दि. २३ जुलै) रोजी जयंती आहे.

Lokmanya Tilak Jayanti: लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त करुया अभिवादन !

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी भीमगर्जना करणारे थोर पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी, निर्भीड वक्ता, प्रखर राष्ट्रवादी असणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज (दि. २३ जुलै) रोजी जयंती आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांचे शिक्षण डेक्कन कॉलेज, पुणे येथे झाले. त्यांनी कायद्याची पदवीही घेतली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. तुरुंगात असताना त्यांनी हिंदूंचा पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवतगीता-कर्मयोग रहस्य यावर भाष्य लिहिले. हे वाचून हिंदू धार्मिक ग्रंथावर त्यांची खोलवर पकड होती असे दिसते. टिळक त्यांच्या क्रांतिकारी विचारांसाठी प्रसिद्ध होते. भारताच्या अशा या शूरवीर स्वातंत्र्यसैनिकाचे १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईत निधन झाले.

देशाच्या स्वतंत्रलढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नेत्यांमध्ये टिळकांचे नाव अभिमानाने घेतले जाते. भारतात ब्रिटिश सरकारविरोधी वाचा फोडण्यासाठी तेव्हा वैचारिक साधनांची आवश्यकता होती. त्यासाठी टिळकांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला. पुण्यात शिकत असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं टिळकांडी स्वप्न पाहिलं. ब्रिटिश सरकारविरोधी धुमसत असलेला राग हा त्यांना प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवायचा होता. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन लढण्याचा मानस त्यांनी ठेवला होता. जर स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं तर मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत राहणार नाही असं मत असणाऱ्या टिळकांनी देशासाठी घरदार सोडून सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली. त्यामुळे आजही लोकमान्य असणाऱ्या या नेत्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान आहे.

परकीयांनी आपल्या देशाच्या धर्म, परंपरेमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, जे करायचं ते आपण आपल्या देशात करायचं असं टिळकांचं मत होतं. त्यामुळे या दोन्ही मित्रांमध्ये वैचारिक मतभेदांमुळे दरी निर्माण झाली ती कायमचीच. लोकमान्य टिळक हे जहाल गटातील एक सोनेरी पान होतं. एक देशसेवक, समाजसुधारक, पत्रकार, संपादक, अशा सर्व भूमिका यांनी जबाबदारीने पार पाडल्या. त्यासाठी संपूर्ण भारत आणि माध्यम क्षेत्र टिळकांचे कायम ऋणी राहतील यामध्ये तीळमात्र शंका नाही. अशा या प्रखर राष्ट्रवादी असणाऱ्या लोकमान्य टिळकांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करूया.

हे ही वाचा:

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर घोषणांचा गोषवारा…

Budget 2024:केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्या साड्यांची चर्चा, नेमकं काय आहे खास ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version