Sunday, June 30, 2024

Latest Posts

Om Birla यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड, PM Narendra Modi, Rahul Gandhi यांनी यांनी थेट आसनापर्यंत पोहोचवलं

१८ व्या लोकसभा अध्यक्षपदासाठी (Loksabha Speaker Election) निवडणूक पार पडली असून भाजपच्या ओम बिर्ला (Om Birla) यांची पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष (Loksabha Speaker) म्हणून निवड करण्यात आली आहे.

१८ व्या लोकसभा अध्यक्षपदासाठी (Loksabha Speaker Election) निवडणूक पार पडली असून भाजपच्या ओम बिर्ला (Om Birla) यांची पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष (Loksabha Speaker) म्हणून निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने झालेल्याला मतदानात एनडीए आघाडीच्या (NDA Alliance) ओम बिर्ला यांना बहुमत मिळाले असून लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागली आहे. विरोधी पक्षाकडून के. सुरेश (K. Suresh) यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ओम बिर्ला यांच्या समर्थनार्थ एनडीए आघाडीच्या १३ घटकपक्षांनी प्रस्ताव मांडला होता. हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब (Bhartuhari Mahtab) यांनी आवाजी मतदानाच्या निर्णयातून ओम बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या आसनापर्यंत पोहोचवले.

लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव सत्ताधारी एनडीए आघाडीकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासह एनडीए आघाडीतील १३ घटक पक्षांनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी , राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, ललन सिंह, शिवराज सिंह चौहान, जितनराम मांझी, चिराग पासवान, कुमारस्वामी, सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी यांनी अनुमोदन दिले. विरोधी पक्ष म्हणजेच इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. के. सुरेश यांच्या नावाला एन. के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले.

तत्पूर्वी, लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने धुडकावून लावली होती. त्यामुळे, इंडिया आघाडीने अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची स्वातंत्र्यानंतरची हि तिसरी वेळ असून पन्नास वर्षांनंतर अशी निवडणूक घेण्यात आली. ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि किरेन रिजिजू यांनी त्यांना आसनापर्यंत पोहोचवले. यावेळी, पंतप्रधान मोदी त्यांनी ओम बिर्ला यांच्या १७ व्य लोकसाभेतील अध्यक्षपदाच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत ‘लोकसभा हे देशातील जनतेचं आवाज मांडणार सभागृह असून लोकसभा अध्यक्ष या आवाजाचे रक्षणकर्ते आहेत,’ असे म्हंटले.

हे ही वाचा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर गर्दी

महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक…नेमकं काय शिजतंय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss