भगवान राम सीतेसोबत दररोज बसून दारू प्यायचे, के. एस. भगवान यांचं वादग्रस्त विधान

भगवान राम सीतेसोबत दररोज बसून दारू प्यायचे, के. एस. भगवान यांचं वादग्रस्त  विधान

सध्या सगळीकडेच महापुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. तर आता पुन्हा एकदा असंच एक वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) कर्नाटकमध्ये करण्यात आलं आहे. प्रभू राम (Lord Rama) हे आदर्श नव्हते आणि त्यांनी ११,००० वर्षे राज्य केले नाही असे वक्तव्य करून नवीन वादाला जन्म दिला आहे. “रामराज्य निर्माण करण्याबाबत चर्चा आहे… वाल्मिकींच्या रामायणातील (Ramayana) उत्तरकांड वाचल्यास हे लक्षात येईल की (भगवान) राम आदर्श नव्हते. त्यांनी ११,००० वर्षे राज्य केले नाही, तर ११ वर्षेच राज्य केले.” असं केएस भगवान यांनी कर्नाटकमधल्या मंड्या, येथे सांगितले. तर ते इतक्यातच थांबले नाही भगवान राम हे दुपारच्या वेळी सीतेसोबत बसून त्यानंतर उरलेला पूर्ण दिवस ते दारू (alcohol) प्यायचे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.

लेखकाच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर हिंदू संघटना (Hindu Association) आक्रमक झाल्या आहेत. सध्या लोकांमध्ये रामराज्य निर्माण व्हावं याची चर्चा सुरू आहे. पण, जर तुम्ही वाल्मिकी रामायणामधील उत्तरकांड वाचलं तर लक्षात येईल की भगवान राम हे आदर्श नव्हते. त्यांनी ११ हजार वर्षं राज्य केलं नव्हतं. त्यांनी फक्त ११ वर्ष राज्य केलं होतं, असा दावा के. एस भगवान यांनी केलाय.

हे सांगत असतानाच त्यांनी प्रभू रामाबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं. भगवान राम हे दुपारच्या वेळी सीतेसोबत बसून त्यानंतर उरलेला पूर्ण दिवस ते मद्य प्यायचे. त्यांनी आपल्या पत्नीला जंगलात पाठवलं. तिचा जराही विचार केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या शूद्र व्यक्तीचं मुंडकं धडावेगळं केलं होतं, त्यामुळं ते आदर्श कसे असू शकतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर के. एस भगवान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीये. सध्या कर्नाटकात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून वक्तव्य मागे घेण्यास भाग पाडत आहेत.

हे ही वाचा:

पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, मनसे अधिकाऱ्यावरच केला गोळीबार

मध्यरात्री २ वाजता शाहरूख खानने केला आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन, पहा नेमकं झालं काय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version