Friday, June 28, 2024

Latest Posts

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न, प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान

नुकताच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये भक्तिमय आणि राममय वातावरण हे दिसून येत आहे.

अखेर ५०० वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज अयोध्येत प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी… शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ऊर अभिमानने भरून आला. अन् मनामनातून जय श्रीरामचा जयघोष निनादला…

आज या सोहळ्यासाठी देशभरातील सर्व नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आज देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले आहेत. नुकताच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये भक्तिमय आणि राममय वातावरण हे दिसून येत आहे.

या सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचं छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले. प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याच्या विधी सुरू झाल्या आहेत. तर प्राणप्रतिष्ठापना सोहळा चालू असताना मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरातील गर्भगृहात विधीवत पूजा केली जात आहे. १२.२९ च्या शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की, “अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम.”

आज या सोहळ्यासाठी फक्त नरेंद्र मोदीच नाही तर देशभरातील सर्व नेतेमंडळी, कलाकार मंडळी, खेळाडू आणि त्याचसोबत मोठं मोठे उद्योगपती देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. राम मंदिर ट्रस्टने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुकेश अंबानी-गौतम अदानीपासून रतन टाटापर्यंत सर्व उद्योगपतींना आमंत्रणे पाठवली आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.राम मंदिर ट्रस्टने मुकेश अंबानी-गौतम अदानीपासून रतन टाटा यांच्यापर्यंत सर्व उद्योगपतींना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

हे ही वाचा:

केस न गळता वजन कमी करायचे असेल तर हे उपाय नक्की करून पाहा

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बनवा खास तांदळाची खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss