मध्य प्रदेश सरकार, संस्कृती विभाग दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांद्वारे राज्याच्या संस्कृती आणि साहित्यातील उत्कृष्टता, सर्जनशीलता आणि उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करते. या उद्देशाने सांस्कृतिक विभागाकडून २०२३ आणि २०२४ या वर्षासाठीचे राष्ट्रीय आणि राज्य सन्मान जाहीर केले जात आहेत. विभागाने स्थापन केलेल्या निवड समितीने या सन्मानांसाठी नावांची निवड केली आहे.
ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू २० च्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा (Dr Sandhya Purecha) यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या कला कारकिर्दीत भरतनाट्यमच्या नर्तिका आणि विदुषी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय लौकिक संपादन केले आहे. ज्येष्ठ शास्त्रीय नर्तक गुरु पार्वती कुमार यांच्या शिष्या असलेल्या डॉक्टर संध्या पुरेसा यांनी भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या प्रमुख म्हणून देखील शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे तसेच अभिनय दर्पण वर नृत्य सादर करणाऱ्या भारतातील त्या एकमेव नृत्य विदुषी आहेत त्याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा म्हणून मंदिर महोत्सव कला प्रवाह युवा कलोत्सब गुरु शिष्य परंपरा आधी उपक्रम राबवत आहेत तसेच ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर नृत्य महापरिषद संगीत नाटक अकादमी तर्फे आयोजित करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण कलाक्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.
श्रीमती संध्या पुरेचा यांचा जन्म २९ डिसेंबर १९६५ रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. संध्या पुरेचा यांनी गुरू आचार्य पार्वतीकुमार यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी भरतनाट्यममधील “नाट्यशास्त्र इन थिअरी आणि प्रॅक्टिस ऑफ अंगिकाभिनया” या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.
संध्या पुरेचा यांची कारकीर्द :
हे ही वाचा:
THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित