Narendra modi : PM मोदींच्या हस्ते उज्जैनमध्ये महाकालाची पूजा व कॉरिडॉरचे उद्घाटन

Narendra modi : PM मोदींच्या हस्ते उज्जैनमध्ये महाकालाची पूजा व कॉरिडॉरचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील उज्जैन महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. मोदी उज्जैनमध्ये सुमारे आज 3 तास असणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता उज्जैनमध्ये २०० संतांच्या उपस्थितीत ते ‘महाकाल लोक’चे उद्घाटन करतील. कार्यक्रमस्थळी वॉटर प्रूफ डोम बांधण्यात आला असून, तेथे ६० हजार लोक उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान क्षिप्रा नदीच्या काठावर हा कार्यक्रम दाखवण्यासाठी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. येथे सुमारे एक लाख लोक जमण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम ४० देशांमध्ये थेट दाखवला जाईल.

हेही वाचा : 

Eknath shinde : अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय समोर, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह आता मशाल विरुद्ध ढाल तलवार

उज्जैन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार पाठक म्हणाले की, पंतप्रधान आज संध्याकाळी महाकाल कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. दुसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. संपूर्ण प्रकल्प जून २०२३ पर्यंत पूर्ण करायचा आहे.

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत ते म्हणाले की, त्यात ‘शिखर दर्शन’ बांधण्यात येणार आहे. महाकालेश्वर मंदिराजवळ असलेल्या ‘महाराजवाडा’ या जुन्या वास्तूत एक प्राचीन धर्मशाळा उभारण्याचे कामही आम्ही करत आहोत. ही इमारत सुमारे १०० वर्षे जुनी आहे. मंदिराजवळ ते अप्रतिम दिसते. त्यासमोर साडेपाच एकर मोकळी जागा असून, तेथे ‘चिंतन वन’, ‘अनुभूती वन’, ध्यान केंद्र आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

मंदिरात भाविकांना प्रवेश बंद नाही

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच एसपीजीने महाकाल मंदिर आणि महाकाल लोक ची कमान हाती घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी महाकाल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कडक सुरक्षा तपासणीतून जावे लागणार आहे. उज्जैनचे एसएसपी सत्येंद्र शुक्ला यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधानांच्या मंदिरात आगमनाच्या वेळीही सामान्य भाविकांना दर्शनापासून रोखले जाणार नाही. परंतु त्यांना मोठ्या संख्येने एकत्र प्रवेश मिळणार नाही. सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही अडचण येवू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

Exit mobile version