Mahalakshmi Murder Case : बंगळुरु महालक्ष्मी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर; प्रियकरानेच हत्या केल्याची भावाकडे कबुली

Mahalakshmi Murder Case : बंगळुरु महालक्ष्मी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर; प्रियकरानेच हत्या केल्याची भावाकडे कबुली

Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याच्या प्रकरणाचा पोलीस खूप वेगाने शोध घेत होते. त्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याच्याशी तिचे संबंध होते, त्यानेच तिची हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. म्हणजे महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवणारा तिचा प्रियकर असल्याचं सांगितलं जात आहे. बंगळुरू (Bengaluru) येथे तिच्याच फ्लॅटमधील फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ माजली होती. महालक्ष्मीचा पती हेमंत दास यांनी सांगितले की, तिच्या कथित प्रियकराविरोधात बंगळुरूमध्ये अनेक महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आलेली पण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचं नाव उघड केलं नाही. त्यामुळे महालक्ष्मीच्या प्रियकराने तिच्यावर चाकूचे वार केलेत असं बोलले जात आहे.

या प्रकरणाच्या संशयात पोलिसांनी चौकशीसाठी तीन जणांना ताब्यात घेतले आहे, त्यातील एक आरोपीचा भाऊ असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आरोपीने आपल्या भावाकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशीही माहिती आहे. महालक्ष्मी आणि संशयित आरोपी मॉलमध्ये एकत्र काम करत असताना २०२३ साली त्यांची भेट झाली. पतीपासून वेगळी झाल्यानंतर महालक्ष्मी बंगळुरू येथे एकटी राहत होती. २०२३ पासून महालक्ष्मी आणि संशयित तरुण रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयित तरुणाने फोनवरून गुन्ह्याची कबुली दिली आणि शहर सोडून जात असल्याबद्दल सांगितले, ही माहिती भावाने पोलिसांना सांगितल्यामुळे या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. तो तरुण ओडिशाच्या (Odisha) आहे. संशयित तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तुकडी पश्चिम बंगालला (West Bengal) रवाना झाली आहे. महालक्ष्मीचा दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्या तरुणाला आला होता याबद्दल तिला विचारले असता त्यांच्यात वाद झाला. या वादामुळेच तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांनी संशयिताच्या पालकांशी संवाद साधला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे सांगितले.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version