Maldives Fire : मालदीवची राजधानी मालेमध्ये भीषण आग

मालदीवची राजधानी माले (Male) मध्ये गुरुवारी दि १० नोव्हेंबर रोजी विदेशी कामगारांच्या घरांमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Maldives Fire : मालदीवची राजधानी मालेमध्ये भीषण आग

मालदीवची राजधानी माले (Male) मध्ये गुरुवारी दि १० नोव्हेंबर रोजी विदेशी कामगारांच्या घरांमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यापैकी ९ जण भारतीय असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या आगीत अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.

मालदीव सरकारच्या एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं की, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मालदीवच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं ट्वीट केलं की, माले येथील आगीत बळी पडलेल्यांसाठी स्टेडियममध्ये मदत आणि बचाव केंद्र उभारण्यात आलं आहे. माले येथील या वेदनादायक घटनेमुळे येथे काम करणाऱ्या परदेशी कामगारांच्या वाईट परिस्थितीची बाब पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालदीवच्या राजकीय पक्षांनी येथे काम करणाऱ्या परदेशी कामगारांच्या परिस्थितीवर टीका केली आहे. २५०,००० पुरुषांच्या लोकसंख्येपैकी परदेशी कामगारांची संख्या जवळपास निम्मी आहे. बहुतेक बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील आहेत, अशी माहिती मिळत आहे. कोरोनाच्या काळात मालदीवमधील परदेशी कामगारांच्या दयनीय स्थितीचे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं आहे. तसेच, मालदीवच्या स्थानिक लोकांपेक्षा परदेशी कामगारांमध्ये कोरोनाचा संसर्ग तिप्पट वेगानं पसरला होता.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांना चार तास लागले. मृतांमध्ये नऊ भारतीय आणि एका बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. आगीत संपूर्ण ईमारत जळून खाक झाली. याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरून त्यांनी १० मृतदेह बाहेर काढले. इमारतीच्या तळमजल्यावरील कार रिपेअरिंग गॅरेजमध्ये आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.” मालदीवमध्ये, भारतीय उच्चायुक्तालयानं (Indian High Commission) माले येथील आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ज्यामध्ये ९ भारतीय नागरिकांसह एकूण १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत ते मालदीप सरकारच्या संपर्कात असल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे.

हे ही वाचा :

मला जर राऊतांनी भेट मागितली तर मी देईन; देवेंद्र फडणवीस

IND vs ENG: नाणेफेक जिंकून इंग्लंडने घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Uddhav Thackeray and Sanjay Raut Live : राऊतांच्या धाडसाचे कौतुक करत, केंद्रीय यंत्रणायाना पाळीव प्राणी म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version