Mangalyaan : अखेर ‘मिशन मंगळयान’ चा The End

मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी भारताने अंतराळात पाठवलेल्या मंगळयान मोहिम (Mission Mangal) तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ही मोहिम संपुष्टात आली आहे. मंगळावर थेट एकाच वेळी पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

Mangalyaan : अखेर ‘मिशन मंगळयान’ चा The End

मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी भारताने अंतराळात पाठवलेल्या मंगळयान मोहिम (Mission Mangal) तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ही मोहिम संपुष्टात आली आहे. मंगळावर थेट एकाच वेळी पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या आठ वर्षापासून अंतराळात असलेल्या मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपल्यानं ही मोहिम संपली आहे. मंगळयानातील इंधन संपलं होते. तसेच त्याची बॅटरीही पूर्णपणे निकामी झाली आहे. मंगळयानाशी असलेला संपर्क तुटला आहे. मात्र इस्रोच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या विषयी माहिती दिली नाही.

मंगळयान मिशन हे २०१३ साली सुरू करण्यात आले होते. या मोहिमेसाठी साडे चारशे कोटी खर्च करण्यात आला होता. मंगळयान मोहिमेला मार्स ऑर्बिटर मिशन असे देखील बोलले जाते. ५ नोव्हेंबर २०१३ ला लाँच केलं होतं. ते २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत पोहोचलं होतं. मंगळयानाने त्याच्या निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा १६ पट अधिक काम केले. मंगळयानाची बॅटरी संपण्याचे मुख्य कारण हे मंगळ ग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इस्रोने मंगळयान वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु मंगळ ग्रहावर सातत्यानं ग्रहणं निर्माण होतं होती. सर्वात मोठं ग्रहण साडे सात तासांच होतं. त्यामुळे मंगळयानाची बॅटरी संपली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळयानाची बॅटरी ही सूर्यप्रकाश नसेल तर एक तास ४० मिनिटं कार्यरत राहिल या पद्धतीने बनवण्यात आली होती. मात्र ग्रहण हे साडेसात तासाचे असल्याने बॅटरी पूर्ण संपली होती.

मंगळयानाच्या मार्स कलर कॅमेऱ्याने १ हजार १०० हून अधिक फोटो काढले. ज्यामुळे मार्स एटलस तयार झाला. या मोहिमेमुळे मंगळ ग्रहावर ३५ हून अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले.

हे ही वाचा:

दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

लग्नासाठी जोडीदार निवडताना ‘या’ ३ चुका करू नका

अशा पद्धतीने करा घरच्या घरी वेज चिकन नगेट्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version