Mann ki Baat: चंदीगड विमानतळाल आता ‘ या ‘ नावाने ओळखले जाणार, नरेंद्र मोदींची नवी घोषणा

M म्हणजे मोहाली, C म्हणजे चंदीगड आणि P म्हणजे पंचकुला. आता विमानतळाचे नाव शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ MCP असेल.

Mann ki Baat: चंदीगड विमानतळाल आता ‘ या ‘ नावाने ओळखले जाणार, नरेंद्र मोदींची नवी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की 1.3 अब्ज भारतीयांना चित्ता परत आल्याचा अभिमान आहे, एक टास्क फोर्स चित्त्यांवर लक्ष ठेवेल, त्यानंतर लोक त्यांना कधी पाहू शकतील हे ठरवले जाईल. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या ९३ व्या भागात आपले विचार मांडताना पंतप्रधानांनी असेही सांगितले की एक कार्यदल मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या आफ्रिकन चित्त्यांवर लक्ष ठेवत आहे आणि सर्वसामान्यांना या चित्ता कधीपासून पाहायला मिळणार याचा अहवालाच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

मोदी म्हणाले, “भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना श्रद्धांजली म्हणून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड, पंजाब आणि हरियाणातील लोकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, याची खूप प्रतीक्षा होती. सरदार भगतसिंग यांची जयंती २८ सप्टेंबर रोजी साजरी केली जाते.

कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेल्या आफ्रिकन चित्त्यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी चित्ता भारतात परत आल्याने आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की हे भारताचे ‘निसर्ग प्रेम’ आहे ज्यामुळे १३० कोटी भारतीय आनंदी आहेत आणि चित्ते भारतात परत आणल्याचा त्यांना अभिमान वाटत आहेत. त्यांनी सांगितले की एक टीम तयार करण्यात आली आहे जी चित्त्यांवर लक्ष ठेवत आहे. हे चित्ते इथल्या वातावरणात कितपत मिसळू शकले आहेत, हे पाहिले जाईल. त्याआधारे काही महिन्यांनी निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चित्ते पाहायला मिळतील.

चित्ता आणि चित्त्यांच्या नावांबाबत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेबाबतही पंतप्रधानांनी देशवासीयांना सल्ले देण्याचे आवाहन केले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत आणि जनसंघाचे संस्थापक सदस्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, “आपण त्यांना जितके जास्त ओळखू तितकेच त्यांच्याकडून शिकू,तेवढीच देशाला पुढे नेण्याची प्रेरणा आपल्याला मिळत जाईल .”पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ची कल्पना पूर्णपणे भारतीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 विमानतळ एक पण शहरं तीन ?

चंदीगड विमानतळाच्या नावावरून पंजाब आणि हरियाणामध्ये बराच काळ वाद सुरू होता. अनेक बैठकीनंतर विमानतळाला शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यावर एकमत झाले. ऑगस्टमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत विमानतळाला भगतसिंग यांचे नाव देण्यावर सहमती झाली होती.

चंदीगड विमानतळ पंजाब, हरियाणा आणि चंदीगड या तीन राज्यांचा भाग आहे, त्यामुळे त्याचे नाव आणि त्यामागे कोणते शहर जोडायचे याबाबत वाद निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात भगवंत मान आणि दुष्यंत चौटाला यांच्यात झालेल्या बैठकीत विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यावर एकमत झाले होते, मात्र शहराच्या नावावर एकमत होऊ शकले नाही.

त्यानंतर विमानतळाच्या नावापुढे मोहाली, चंदीगड आणि पंचकुला या तीन शहरांची नावे जोडली जातील, असे मान्य करण्यात आले. थोडक्यात MCP असे लिहिले जाईल. M म्हणजे मोहाली, C म्हणजे चंदीगड आणि P म्हणजे पंचकुला. आता विमानतळाचे नाव शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ MCP असेल.

हे ही वाचा:

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी – दीपक केसरकर

कोरोना काळात तुम्ही रात्री… अंबादास दानवेंचा पलटवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version