spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठी अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे, सचिन सावंत यांचा आरोप

भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आणि सीमाशुल्क आणि जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त, भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आणि सीमाशुल्क आणि जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त, भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सचिन सावंत यांच्या अटकेमुळे त्यांची पार्श्वभूमी आणि बेकायदेशीर कामांमध्ये सहभाग याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले IRS अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडण्याच सत्र सुरूच आहे.

याचदरम्यान सचिन सावंत यांना वैद्यकीय तपासणीसाठी ईडीचे अधिकारी रुग्णलयात नेत होते. यावेळी माध्यमे समोर येताचा ईडी अधिकाऱ्यांचा विरोध स्वीकारून प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. ईडीने सचिन सावंत यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन संवंत यांनी त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता जमावली आहे. आता पर्यत केलेल्या तपासामध्ये २.४५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. त्यात सानपाडा येथील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे.

ईडीने सचिन सावंत यांच्या बाबतीत माहिती दिली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०२० दरम्यान स्वतःच्या आणि कुटुंबीयांचा नावे संपत्ती जमवली असल्याचं उघड झाले आहे. त्याचबरोबर सानपाडा १०३२ चौरस फुटांचा फ्लॅट वडिलांच्या मार्फत सेव्हन हिल्स कंपनीच्या नावे केली आहे असे तपासामध्ये उघड झाले आहे.

हे ही वाचा:

तुम्ही नवजात बाळाच्या आई आहात? तर पावसाळ्यात तुमच्या लहानग्यांची घ्या काळजी…

Smriti Irani यांचा Rahul Gandhi यांच्यावर मोठा आरोप, म्हणाल्या…

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत तर एकाचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss