बाजारातील मंदीचा गौतम अदानींना बसला फटका; श्रीमंतांच्या यादी झाला मोठा फेरबदल

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये २.२९ टक्क्यांनी घट झाली.

बाजारातील मंदीचा गौतम अदानींना बसला फटका; श्रीमंतांच्या यादी झाला मोठा फेरबदल

जगभरात मंदीचे वातावरण निर्माण झाले असून शेअर बाजारातील घसरणीमुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. सोमवारी, त्याच्या संपत्तीत ५६,२६२ कोटी रुपयांची (६.९१ डॉलर अब्ज) घट झाली आणि ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार त्यांची एकूण संपत्ती १३५ अब्ज डॉलरपर्यंत घसरली आणि ते Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या खाली घसरले आहेत.

सोमवारी बेझोसच्या संपत्तीत १.३६ अब्ज डॉलरची वाढ झाली आणि १३८ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह ते पुन्हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क २४५ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये २.२९ टक्क्यांनी घट झाली. अदानी ट्रान्समिशन ५.६५ टक्के, अदानी टोटल गॅस ४.७६ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी ४.८३ टक्के, अदानी पोर्ट्स ५.४८ टक्के, अदानी पॉवर इट ४.९५ टक्के आणि अदानी विल्मार पाच टक्क्यांनी घसरले. म्हणजेच शेअर बाजारातील घसरणीचा अदानींना जोरदार फटका बसला आहे. तसेच अलीकडेच अदानी यांनी अलीकडेच बेझोसला मागे टाकत श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते, मात्र बेझोस पुन्हा एकदा पुढे गेले आहेत.

दरम्यान देशातील सर्वात मौल्यवान कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या १० मधून बाहेर पडले आहेत. सोमवारी रिलायन्सचे शेअर २.५४ टक्क्यांनी घसरले. यासह अंबानींच्या एकूण संपत्तीत २.८३ अब्ज डॉलरने घट झाली आणि ८२.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह मुकेश अंबानी आता श्रीमंतांच्या यादीत ११व्या क्रमांकावर घसरले आहेत. १० व्या स्थानावर लॅरी एलिसन आहे, ज्यांची एकूण संपत्ती ८४.९ अब्ज डॉलर आहे.

हे ही वाचा:

जागतिक पर्यटन दिनानिमित्त काँग्रेसने उडवली पीएम मोदींची खिल्ली म्हणाले, ‘महागड्या विमानांतून…

पंजाबमधील आप सरकार करणार, शहीद भगतसिंग यांची जयंती खास पद्धतीने साजरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version