spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मार्क्सवादी नेते अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; आज शपथविधी पडणार पार

श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूका झाल्या. श्रीलंकेत मार्क्सवादी नेते अनुरा दिसनायके (Anura Kumara Dissanayake) यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. अनुरा दिसनायके यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदी निवड करण्यात आली आहे. नॅशनल पीपल्स पॉवर (National People Power) आघाडीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे ते उमेदवार होते. अनुरा दिसनायके हे श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष (Sri Lanka First Marxist President) झाले आहेत. ५७ लाख ४० हजार १७९ मतं मिळवत अनुरा दिसनायके विजयी झाले आहेत. त्यामुळे अनुरा दिसनायके यांचा शपथविधी आज पार पडणार आहे.

अनुरा दिसनायके यांना साधारणपणे ‘एकेडी’ (AKD) असे संबोधले जाते. दिसनायके यांचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून (Colombo) १०० किमी दूर असलेल्या थम्बुटेगामा (Thambuttegama) येथे झाला. कोलंबोमधील केलनिया विद्यापीठात (University of Kelaniya) त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं. १९८७ साली अनुरा यांनी ‘जेव्हीपी’मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते श्रीलंकेच्या राजकारणात सहभागी आहेत. जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि श्रीलंका या दोन देशात झालेल्या कराराला ‘जेव्हीपी’ ने विरोध केला होता. तो करार म्हणजे श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचं ‘जेव्हीपी’ चे मत होते.

मार्क्सवादी नेते पहिल्यांदाच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष
श्रीलंकेत झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी समगी जन बलवेगया पक्षाचे नेते साजिथ प्रेमदासा (Sajith Premadasa) आणि अनुरा दिसनायके या दोघांमध्ये चुरस झाली. पहिल्या फेरीत दोघांपैकी एकालाही ५० टक्केपेक्षा जास्त मत मिळाली नाहीत त्यामुळे दुसऱ्या फेरीत मतमोजणी करावी लागली. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत अनुरा दिसनायके यांचा बहुमताने विजय झाला. सजीत प्रेमदासा यांना ३२.८ टक्के मतं मिळाली आणि अनुरा दिसनायके यांना ४२.३१ टक्के मतं मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत अनुरा दिसनायके यांनी विजय मिळवला आहे.

हे ही वाचा:

वरळीत तीन आमदार मात्र झिरो विकास! Shrikant Shinde यांची उबाठावर घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss