पेप्सी इंडियाने केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस…

“स्त्रोतांचे म्हणणे आहे की आर्यभट्टाने पेप्सी ब्लॅकमधील कॅलरीजची संख्या मोजण्यासाठी शून्याचा शोध लावला.”

पेप्सी इंडियाने केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर पडतोय मिम्सचा पाऊस…

हल्ली सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. मग तो एखादा व्हिडिओ असो किंवा फोटो असो किंवा वाक्य. एकदा एखादी गोष्ट सोशल मीडियावर पसरली की अगदी शेतातल्या आगीप्रमाणे वेगाने पसरते. अनेक कंपन्या आपलं एखादं प्रॉडक्ट बाजारात विकलं जावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं मार्केटिंग करत असतात आणि असंच आपल्या एका प्रॉडक्टबद्दल म्हणजेच झीरो कॅलरीज असणाऱ्या ‘ब्लॅक कोक’ बद्दल बोलत असताना पेप्सीइंडियाने भारतीयांची छान कनेक्ट होऊ शकणारं एक विनोदी ट्विट केलं आणि ते ट्विट म्हणजे “स्त्रोतांचे म्हणणे आहे की आर्यभट्टाने पेप्सी ब्लॅकमधील कॅलरीजची संख्या मोजण्यासाठी शून्याचा शोध लावला.”

आर्यभट्ट, जे भारतीय गणित आणि खगोलशास्त्राच्या शास्त्रीय युगातील प्रमुख गणितज्ञ-खगोलशास्त्रज्ञांपैकी पाहिले असे गणितज्ञ आहेत ज्यांना शून्याचा शोध लावल्याचे श्रेय दिले जाते. जगातील विविध संस्कृतींमध्ये शून्याच्या उगमाचे किंवा शोधाचे पुरावे आहेत असा युक्तिवाद अजूनही होत आहे.

मंगळवारी संध्याकाळी, आर्यभट्टानी पेप्सीच्या प्रॉडक्टसाठी शून्याचा शोध लावला, या ट्वीटपासून प्रेरणा घेऊन, “माझ्या कुटुंबात मला किती महत्त्व आहे हे दाखवण्यासाठी आर्यभट्टानी शून्याचा शोध लावला,” किंवा मग “आर्यभट्ट को एक विचार आया (आर्यभट्टांना एक कल्पना सुचली) आणि आता मला माझ्या बँक खात्यात 0 सोबत अधिक आकडे जोडण्यासाठी दररोज काम करावे लागते” अशी विविध प्रकारची काही विनोदी तर काही मिश्किल ट्विटरस करत आणि मीम्स शेअर करत पेप्सीच्या या पोस्टला डोक्यावर घेतले.

ट्विटरवरील मिम्सपैकी काही मजेदार मिम्स:

 

 

 

Exit mobile version