spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मेरे यार की शादी है…!, Anant-Radhikaच्या लग्नात Arjun Kapoorची युनिक स्टाईल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचे यांचं लग्न म्हणजे चर्चेचाच विषय बनला आहे. भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचे यांचं लग्न म्हणजे चर्चेचाच विषय बनला आहे. भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. सोशल मीडियावर देखील लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. राधिका-अनंत यांच्या लग्नासाठी परदेशी पाहुणे देखील भारतात पोहोचत आहेत. त्यांच्यासाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनंत आणि राधिका यांच्या विवाहनिमित्त अनेक बॉलिवूड स्टार देखील हजेरी लावत आहेत.

अनंत आणि राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये संपन्न होत आहे. या लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार पोहोचत आहेत. अभिनेता जॅकी श्रॉफ, राजकुमार राव, पत्रलेखा, अनन्या पांडे यांच्यासोबत अनेक देशी-विदेशी पाहुणे अनंत आणि राधिकाच्या लग्नाला पोहोचले आहेत.  पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबीय स्वतः उपस्थित आहेत. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत असली तरी परंपरापासूनही ते दूर राहिलेले नाही. नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल या लग्नासाठी उपस्थित आहेत. तसेच मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा ही पती आनंद पिरामल आणि मुलगा आकाश हा पत्नी श्लोकासोबत उपस्थित आहे.

अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला अभिनेत्री सारा अली खान, इब्राहिम अली खान, खुशी कपूर, अनिल कपूर, मुलगी शनाया कपूर आले आहेत. तसेच भारतीय माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत, मुंबई इंडियन्स आणि भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माही येथे पोहोचले आहेत. अभिनेत्री सारा अली खान, इब्राहिम अली खान, खुशी कपूर, अनिल कपूर, मुलगी शनाया कपूर, भारतीय माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत आपल्या पत्नीसोबत आले आहेत. तसेच, अभिनेता मीझान जाफरी, मुंबई इंडियन्स आणि भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माही येथे पोहोचले आहेत. मात्र या सर्वात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांची एन्ट्री मात्र जोरदार झाली. त्याने आपल्या कपड्यांवर ‘मेरे यार की शादी है’ असे लिहिले आहे. त्याची एन्ट्री होताच त्याच्या कपड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हे ही वाचा:

ANANT- RADHIKA यांच्या लग्नाआधी गृहशांती पूजेचे कार्य पडले पार ; VIREN MERCHANT झाले भावुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss