spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्रद्धा हत्या प्रकरकणात मोठी बातमी; वेगवेगळ्या हत्यारांनं श्रद्धाच्या…

मुंबईतील श्रद्धा हत्याकांडाचा तपास दिल्लीच्या छतरपूरमध्ये निर्णायक वळणावर आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या पालकांचे जबाब नोंदवले आहेत. बुधवारी आफताबची पॉलीग्राफ चाचणी म्हणजेच लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. श्रद्धा हत्या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, या प्रकरणातील आरोपी अफताब यानं वेगवेगळ्या हत्यारांनी श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले होते. खुद्द अफताबनंचं पॉलिग्राफी टेस्ट दरम्यान पोलिसांनी याची माहिती दिली.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी अफताबनं पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाच्या शरिराचे तुकडे करण्यासाठी त्यानं वेगवेगळ्या हत्यारांचा वापर केला. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ५ मोठे चाकू जप्त केले होते. ही हत्यारं फॉरेन्सिक टीमकडं तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, अफताबची आज पॉलिग्राफी टेस्ट पार पडली, उद्या देखील ही टेस्ट होणार आहे. दरम्यान, आजच्या चाचणीत त्यानं काही महत्वाचे खुलासे केले आहेत. सुप्रीम कोर्टानं अफताबच्या पॉलिग्राफी आणि नार्को टेस्टला परवानगी दिली आहे. त्यानुसार त्याच्या या चाचण्या केल्या जात आहेत. पॉलिग्राफी टेस्टनंतर अफताबची नार्को टेस्ट होणार आहे.

व्यक्तीकडून खरी माहिती बाहेर काढण्यासाठी नार्को चाचणीचा वापर केला जातो. त्यामुळं नार्को टेस्ट आणि उपलब्ध पुरावे यांची सांगड लागते का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाची श्रद्धा वालकरला गेल्या दोन वर्षांपासून माहिती होती का? असा विचार करायला लावणारं एक पत्र समोर आलं आहे. यानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं २०२० मध्येच केली होती, अशी माहिती येत आहे. यात आफताब गळा दाबून मारण्याची आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं या तक्रारीत नमूद आहे. तसंच आफताबच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याच्या या वागण्याची माहिती होती, असंही श्रद्धानं या पत्रात लिहील्याचं समोर आलं आहे. मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिल्याची माहिती आहे.. श्रद्धानं काही काळानंतर ही तक्रार मागे घेतल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा : 

Exclusive : चमकायला शो सैनिक, केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक

राज ठाकरे हे २९ नोव्हेंबरला कोल्हापूरसह कोकणाच्या दौऱ्यावर; कार्यकर्त्यांकडून तयारीला सुरवात

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss