Monday, July 1, 2024

Latest Posts

Meta AI in WhatsApp : Whatsapp चं नवं फिचर पाहिलात का ? आता AI सोबत करु शकता संवाद

दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे मालक असलेल्या मेटा कंपनीने आता चक्क व्हॉट्सअॅप (whatsapp)वर नवं फिचर आलं आहे. 

सध्या जग हे तंत्रज्ञानांच्या युगात चालत आहे. तंत्रज्ञानाचा इतका अधिक वेग वाढत असल्याने पुढील जग हे तंत्रज्ञानावर चालेल की काय असा प्रश्न उद्भवत आहे.काही ना काही बदल जीवनात होतच असतात त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक बदल होत असताना दिसत आहे. त्यातच चॅट जीपीटी (ChatGPT) हे देखील एक तंत्रज्ञानच आहे. अभ्यासासंदर्भातील किंवा आपल्या रोजच्या दैनदिन नियोजनासंदर्भात कोणताही प्रश्न विचारल्यावर एगदी चुटकीत त्या प्रश्नाचं उत्तर भेटतात. गणितातील फॉर्म्युला असो किंवा इतर गोष्टी सर्व प्रश्नांची उत्तरं चॅट जीपीटी (ChatGPT) वर त्वरित मिळतात.दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे मालक असलेल्या मेटा कंपनीने आता चक्क व्हॉट्सअॅप (whatsapp)वर नवं फिचर आलं आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचे मालक असलेल्या मेटा कंपनीने मेटा एआय (Meta AI) या नावाचे एक नवे फिचर आणलं आहे. याआधी फक्त स्नॅपचॅट (Snapchat) , इन्स्टाग्राम (Instagram) या मध्ये वापरता येत होतं पण आता व्हॉट्सअॅप(whatsapp) वर देखील वापरता येणार आहे. मेटाचं एआय वर्जन हे अनेक देशात वापरता येत होतं पण आता हे फीचर भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आले आहे. या फीचरचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी करता येतो.

व्हॉट्सअॅप (whatsapp) अपडेट झाल्यावर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर मेटा एआयचं नवं फीचर दिसत आहे. व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यात एक निळ्या आणि जांभळ्या रंगाचं एक गोलाकार वर्तुळ दिसत आहे. ते वर्तुळ म्हणजेच एआय(AI)चं नवं फीचर आहे. त्यात तुम्ही क्लीक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन दिसतो. जसं आपणं इतरांशी संवाद साधतो त्याच पद्धतीने एआय(AI) सोबत आपण संवाद साधू शकतो. अनेक प्रश्नांची उत्तरे  मेटा एआय आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर मेटा एआय आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतं. मेटा एआयला काही विचारायचे असल्यास तुम्ही चॅट्स ऑप्शनमध्ये जाऊन वर सर्च बारमध्ये @MetaAI असं सर्च करू शकता.

हे ही वाचा:

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss