ट्विटर मागोमाग मेटा देखील करणार कर्मचाऱ्यांची कपात ?

ट्विटर मागोमाग मेटा देखील  करणार कर्मचाऱ्यांची कपात ?

फेसबुकची पॅरेंट कंपनी ‘मेटाचे गेल्या दोन वर्षाच्या तिमाहीक नफ्यामध्ये घट झाल्यानंतर मेटा सुद्धा कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची अपेक्षित होत. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ऑगस्टमध्ये एका बैठकीत कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, कंपनीमध्ये असे लोक आहेत ज्यांना येथे नसला हवे . या नंतर मेटमधूनहि कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता वाढली आहे .

मेटाने अभियंत्यांची भरती थांबवली आहे मेटाचे जगभरात जवळपास ८७ हजार कर्मचारी आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसह विविध प्लॅटफॉर्म्सवर हे कर्मचारी कार्यरत आहेत. या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती.मेटाच्या तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर मार्क झुकरबर्ग यांनी ‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांमध्ये २०२३ या वर्षाच्या शेवटपर्यंत वाढ करण्यात येणार नाही, तर २०२३ या वर्षामध्ये कंपनीचा गुंतवणुकीवर भर असेल, असं स्पष्ट केलं होतं.

मेटाचा तिमाहीक नफा घसरून ४.४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. नफा ५२ टक्क्यांनी घसरल्यानंतर आता या कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आला आहे. मेटाच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे बाजारमूल्य ६०० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे.मेटच नाही तर अमेरिकेतील बऱ्याच कंपन्यांचं बाजार मूल्य हे घसरल्याची माहिती मिळाली आहे .

एलॉन मस्क यांनी ट्विटरमधील तब्ब्ल ५०% कर्मचाऱ्यांची कपात केली असून ट्विटरचा तिमाहीक नफा घसरल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे . एलॉन मस्क यांनी महिन्याभरात जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. त्यामध्ये भारतातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे . एलॉन मस्क यांच्या ट्विटर प्रतीच्या निर्णयानंतर बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी अभियंत्यांची भरती थांबवली असल्याची माहिती समोर आली आहे .

Exit mobile version