Microsoft Teams Down भारतात मायक्रोसॉफ्ट टीम्सची सेवा ठप्प, हजारो वापरकर्ते नाराज

आउटलुकच्या जवळपास ३,००० वापरकर्त्यांनीही सेवा खंडित झाल्याची तक्रार केली आहे.

Microsoft Teams Down भारतात मायक्रोसॉफ्ट टीम्सची सेवा ठप्प, हजारो वापरकर्ते नाराज

मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवा भारतात ठप्प झाल्या आहेत. रिपोर्टनुसार, भारतात मायक्रोसॉफ्टच्या मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams) आणि आउटलुक (Outlook) या सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अनेक युजर्स सतत तक्रारी करत असतात. Downdetector.com ने देखील या आउटेजची माहिती दिली आहे. आतापर्यंत ३,७०० हून अधिक वापरकर्त्यांनी DownDetector वर तक्रार केली आहे. आउटलुकच्या जवळपास ३,००० वापरकर्त्यांनीही सेवा खंडित झाल्याची तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) अनेक सेवा भारतात ठप्प झाल्यामुळे वापरकर्ते कोणत्याही प्रकारे एकमेकांना कॉल आणि मेसेज करण्यास समस्या येत असल्याची तक्रार केली आहे.

या आउटेजवर, मायक्रोसॉफ्टने ट्विट केले आहे की आम्ही या आउटेजची चौकशी करत आहोत. या आऊटेजमुळे अनेक Microsoft 365 सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे आता ट्विटरवर #MicrosoftTeams ट्रेंड होत आहे. यावरून तुम्ही अंदाज लावूच शकता कि या आऊटेजमुळे वापरकर्ते किती त्रस्त झाले आहेत. Microsoft Office 365 सेवा बंद झाल्यानंतर ट्विटर वापरकर्ते या गोष्टीची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. बरेच वापरकर्ते म्हणत आहेत की हे सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे परिणाम आहेत. याशिवाय या परिस्थितीची मस्करी करणारी मीम्सही ट्विटरवर शेअर केली जात आहेत.

हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल की मायक्रोसॉफ्टने नुकतेच कर्मचाऱ्यांना कमी केले (Microsoft Layoff) आणि सेवा तात्काळ ठप्प झाली. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही अशीच स्थिती ट्विटरची (Twitter) झाली होती. टाळेबंदीच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटर डाउन होते. ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ३ वाजल्यापासून वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागला. ट्विटर डाऊन असतानाही सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल झाले होते.

हे ही वाचा:

Republic Day 2023 Tiranga Dhokla , यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त घरातल्या घरात बनवा तिरंगा ढोकळा

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट झाला लीक, तेही HD प्रिंटमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version