spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद

वाढत्या महागाईमुळे जनता सरकारवर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करण्याच्या दिशेने पाऊलं उचलणार आहे.

सध्या सगळीकडेच महागाईचे चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल (Petrol Diesel) सोबतच भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. या वाढत्या महागाईमुळे जनता सरकारवर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करण्याच्या दिशेने पाऊलं उचलणार आहे. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या महिन्यातील महागाईची सरासरी पाहता पाच टक्क्यावरून साडेसात टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

टोमॅटोच्या किंमतींमध्ये तर कितीतरी पटीने जास्त वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता शंभरीपार गेले आहेत. खाद्यपर्थांच्या किंमतीमध्ये देखील प्रचंड वाढ होताना दिसत आहे. तर दुधाच्या दरसुध्दा वाढले आहेत. वर्षभरात दुधाच्या दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. येत्या एक-दोन महिन्यात कांद्याचे भाव दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे आता वाढती महागाई कमी करण्यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईमुळे निवडणूकीवेळी होणारे परिणाम आणि सरकारं पडल्याचा इतिहास सर्वच राजकीय पक्षांना माहित आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या वेळी मोदी सरकार वाढत्या माहागाईमुळे जनतेची नाराजी पत्करणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तसेच एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुका आहेत. येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच वित्तीय तूटीचे भार अधिक वाढू नये यासाठी काही मंत्रालयांचे बजेट देखील कमी करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

लवकरच सुरु होणार नॅान एसी वंदे भारत ट्रेन!

हा पक्षी वर्षातून फक्त एकदाच पाणी पितो, आहे तरी कोण ?

शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची बीडमध्ये उत्तर सभा?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss