spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोदींनी जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद सोपवलं ब्राझीलकडे

दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० शिखर परिषदेचा आज समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी त्यांनी येत्या २०२४ या वर्षाकरिता अध्यक्षपद ब्राझीलकडेही सोपावलं.

दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० शिखर परिषदेचा आज समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी त्यांनी येत्या २०२४ या वर्षाकरिता अध्यक्षपद ब्राझीलकडेही सोपावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्याकडे जी-२० चं अध्यक्षपद सोपवलं आहे. जी-२० समुहांच्या अध्यक्षतेचं प्रतिक असणारं गेवल (हातोडा) त्यांच्याकडे सोपवण्यात आला. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या जागतिक परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत अनेक मुद्दे चर्चिले गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. भारताने ब्राझीलला गेवल दिलं. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ब्राझील हे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळेल. जी-२० ची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे जातील. आम्हीही या काळात जी मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न करू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांनीही आपलं मत मांडलं. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले. जी-२० च्या या परिषदेतच्या समारोपात पंतप्रधानो मोदी यांनी ब्राझीलला आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्याचवेळी, ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणाले की, जी-२० परिषदेचे कार्यक्षमतेने नेतृत्व केल्याबद्दल आणि या शिखर परिषदेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदी आज ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्याशीही पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी आज भारताचे महत्त्वाचे भागीदार देश UAE आणि दक्षिण कोरिया यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान जी-२० चे महत्त्वाचे सदस्य असलेल्या युरोपियन युनियनच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

हे ही वाचा: 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची टीका

सूरज पांचोली गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss