spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

money saving tips, तुमचा पगार येताच सर्व पैसे होत आहेत खर्च? तर वापरा बचतीचा ‘हा’ फॉर्म्युला

सध्याच्या काळात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याचा अखेर हा जरा कठीण असतो. यावेळेस नोकरी करणाऱ्यांना घर आणि गाडीसाठी काढलेल्या कर्जामुळे गरज भागवणं कठीण जात. अशा वेळेस त्यांच्यावर दुसऱ्यांना पैसे मागण्याची वेळ येते. नोकरदार वर्गाचा पगार होताच पहिल्या आठवड्यात घर, गाडी, मोबाईल आदींचे हप्ते कापून घेतले जातात. त्यानंतर जेवढे पैसे शिल्लक राहतात. त्यावर त्यांना त्यांचा बाकीच्या गरज भगवाव्या लागतात. पण यासाठी आमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमची कर्ज आणि गरज या दोन्हीचे व्यवस्थापन करू शकता.

आता आम्ही जो फॉर्मुला सांगणार आहोत त्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन केले तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्जाची चिंता राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या गरजा देखील भागवू शकाल. तुमच्या घरातील बजेटचे नियंत्रण करण्यासाठी ५०, ३०, २० या फॉर्म्युलाचा वापर करा. यामुळे तुम्ही तुमच्या बजेट आणि खर्चावर सहज रित्या नियंत्रण ठेवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार महिन्याच्या २५ तारखेपासून दुसऱ्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होतो. यासाठी हे लोक सहसा १ ते १० तारखेपर्यंत हप्त्याची तारीख निवडतात. म्हणूनच तुमच्या पगारातील ५० टक्केभाग हा तुमच्या कर्जाच्या हप्त्यांसाठी बाजूला ठेवा.तुमच्या पगारातील ५० टक्के भाग हा तुमचा मूळ खर्च आहे. यामध्ये तुमच्या घराचे भाडे, घराचा ईएमआय, पेट्रोल, किराणा या सर्व खर्चाचा समावेश होतो. यामध्ये तुम्ही काहीही बदल करू शकणार नाही. म्हणूनच तुमचा पगार येताच मूळ खर्चासाठी लागणारी रक्कम हि तुम्ही बाजूला काढून ठेवा. मुख्य म्हणजे हप्ते किती असावे यासाठी पर्याय असतो म्हणूनच तुमच्या पगाराचा काही भागच हप्ते ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे पगारातील ५० टक्के भाग तुमच्याकडे राहील.

तुमच्याकडे असलेल्या ५० टक्के भागापैकी ३० टक्के भाग तुम्ही तुमच्या इतर खर्चासाठी वापरू शकता. म्हणजेच हॉटेलिंग, फिरणे, नवीन गोष्टी विकत घेणे, जसे की फोन, कपडे, म्हणजेच तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या पगारातील या ३० टक्के भागाचा वापर करू शकता. पगारातील या ३० टक्के रकमेचे तुम्ही तुमच्या गरजेनुसार व्यवस्थापन करू शकता. आता तुमच्या पगारातील बाकी असलेला २० टक्के भाग तुम्ही गुंतवणुकीत वापरा म्हणजे म्युचल फंड, एफ डी, पोस्टाच्या योजना, या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही तुम्ही गुंतवणूक करू शकता.

हे ही वाचा:

Mhada Lottery 2023, मुंबईकरांसाठी खुशखबर! तब्बल ४७२१ घरांची लॉटरी

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

ती जुनी गोष्ट झाली, बृजभूषण सिंग वरमले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss