spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कंबर मटकवत माकडांनी केला हूला हूप डान्स

माकडाला इतक्या अचूकपणे हूल हूप खेळताना पाहून सारेच थक्क झालेत.

मुंबई : आपण माकडांचे खूप खेळ पाहिले आहेत. सगळ्यात जास्त जर कोणता मजेशीर प्राणी असेल तर तो म्हणजे माकड. कुत्रे, मांजरी यांनतर जर कोणता प्राणी दिसत असेल तर तो म्हणजे माकड. भारतात अशी कदाचित कोणती जागा असेल जिथे माकड नसतील. माकड खरतर कोणाच्या वाटेल जात नाही पण त्यांची कोणी खोड काढली तर ते सोडत नाहीत.

हेही वाचा

या 3 ट्रिक्स वापरून चेहरा बनवा तजेलदार

डोंबारीचा खेळ आपण याआधी सगळ्यांनी पाहिला असेल. ज्यामध्ये पाळीव माकड आपले खेळ दाखवतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये माकडाचा व्हिडीओ बघून पोट धरून हसायला लावतोय. हा व्हिडीओ खूप कमी वेळेत जास्त व्हायरल झाला आहे.

हेही वाचा

पी. व्ही. सिंधू सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

खरंतर व्हिडीओ मध्ये माकडं हुला हूप खेळताना दिसतायत. आपण याआधी मुलांना, मोठ्या माणसांना, हुला हूप खेळताना बघितलंय. या व्हिडिओमध्ये पाहिलंत तर, माकड कंबर मटकवत हुला हूप करतायत. प्रत्यक्षात हे भल्या भल्या माणसांना जमत नाही. पण त्यात एका माकडाला इतक्या अचूकपणे हूल हूप खेळताना पाहून सारेच थक्क झालेत. हा विडिओ सोशल मीडियावर ट्विटरवर Creature of God च्या अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. 11 सेकंदात 17 हजार लोकांनी हा लोंकानी व्हिडीओ पाहिला आहे. आणि अजून देखील याचे त्यात वाढ होतेय. हा व्हिडिओ पाहून कोणालाही हसू आवरत नाहीए.

Latest Posts

Don't Miss