spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Morbi Bridge Collapse : ओरेवा कंपनीच्या मॅनेजरचे धक्कादायक विधान म्हणाले ; ‘…अपघात ही ईश्वराची इच्छा’

गुजरातमधील मोरबीमध्ये रविवारी पूल कोसळून झालेल्या धक्कादायक अपघाताप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली. झुलत्या पूलाच्या तारांना गंज लागला होता. त्या तारांची दुरुस्ती केली असती तर अपघात घडला नसता अशी माहिती तपास अधिकारी आणि मोरबीचे पोलीस उपअधीक्षक पी.ए. जाला यांनी मंगळवारी कोर्टाला दिली. तर, पोलिसांनी अटक केलेल्या ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने ही ईश्वराची इच्छा असल्याने अपघात झाल्याचे म्हटले.

हेही वाचा : 

आदित्य ठाकरेंनी सत्तारांचे चॅलेंज स्वीकारले; ७ नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये शिवसंवाद यात्रा

या अपघातप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. त्यापैकी ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने मुख्य मॅजिस्ट्रेट आणि अतिरिक्त वरिष्ठ सिव्हिल न्यायाधीश एम. जे. खान यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला. त्यावेळी पारेख याने धक्कादायक विधान केलं आहे.

तपास अधिकारी जाला यांनी कोर्टात सांगितले की, हा पूल तारांवर होता. या तारांना ऑईलिंग अथवा ग्रीसिंग करण्यात आले नव्हते. ज्या ठिकाणी तारा तुटल्या त्यांना गंज लागला होता. जर तारांची दुरुस्ती केली असती तर अपघात झाला नसता. पुलाच्या दुरुस्तीचे कोणते काम करण्यात आले, ते काम कसे करण्यात आले, याबाबत माहिती देणारे कोणतेही दस्ताऐवज ठेवण्यात आले नाहीत. पुलाची दुरुस्ती आणि देखभालीसाठी जे साहित्य खरेदी करण्यात आले, त्याची तपासणी करणे अद्याप बाकी असल्याचीही माहिती कोर्टाला देण्यात आली.

Bharat Jodo Yatra : अभिनेत्री पूजा भट्ट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी; फोटो झाले व्हायरल

मोरबीमध्ये नेमकं काय घडलं?

रविवारी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास ही घटना घडली. या भागात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला हा पूल सहा महिने नूतनीकरणासाठी बंद होता. एका खासगी कंत्राटदाराने डागडुजी केल्यानंतर गुजराती नववर्षदिनी, २६ ऑक्टोबरला पूल पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र हा पूल वापरयोग्य असल्याचे प्रमाणपत्र पालिकेने दिलं नव्हतं, अशी माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सज्ज; पुण्यात ३५०० ‘राज’दूतांची नेमणूक

दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे पुलावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. गर्दीमुळे वजन न पेलल्यामुळे पूल कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Latest Posts

Don't Miss