कोकणात जाणाऱ्या अधिकच्या रेल्वेगाड्या वाढवणार; गणेशउत्सवासाठी Central Railway ने घेतला मोठा निर्णय

कोकणात जाणाऱ्या अधिकच्या रेल्वेगाड्या वाढवणार; गणेशउत्सवासाठी Central Railway ने घेतला मोठा निर्णय

गणेशउत्सव म्हंटल की गावी जाण्याची ओढ काही केल्या थांबू शकत नाही. त्यातही जर कोकणातले गणपती म्हंटल तर लालामातीत कोरलेली शाडूची गणपती बाप्पाची मूर्ती समोर येते. कोकणातील सर्वात जास्त प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे हा गणेशउत्सव सण होय. कोकणातील चाकरमानी हे सुट्टी असो वा नसो गणपतीला कोकणात गेले नाहीत असं होत नाही. या उत्सवाची सर्व प्रकर्षाने वाट पाहत असतात. कितीतरी महिन्यांआधी पासूनच चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सीट्स बुक करत असतात. त्यातच आता एक नवी खुश खबर आली आहे.

गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात (Konkan) जातात. यासाठी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्याआधीच गाड्यांचे बुकिंग करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. मात्र अनेकवेळ रांगेत उभे राहूनही अनेकांना आरक्षण मिळत नाही, यासाठी दरवर्षी मध्यरेल्वेकडून (Central Railway) विशेष गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वेने २०२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आणखी काही रेल्वे गाड्या सोडण्याची गरज असल्याने मध्य रेल्वेने नव्या गाड्या सोडण्याचा व फेऱ्या वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोणत्या आहेत त्या गाड्या ?

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मध्य व पश्चिम रेल्वेने (Western Railway) आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील गाड्या असणार आहेत. 

दरम्यान, या गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण उद्यापासून (६ ऑगस्ट) सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

आमदार अपात्रतेबाबत Supreme Court मध्ये होणार सुनावणी; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

Uddhav Thackeray यांचा आज दिल्लीदौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version