Most Expensive Watermelon – लाखोंच्या किमतीला विकले जात आहे हे कलिंगड कसे ते जाणून घ्या

टरबूज ऊर्फ कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे.कलिंगड हे पारंपारिकपणे उन्हाळ्यात खाणे चांगले आहे असे मानले जाते कारण ते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. काही स्तोत्रांनुसार, टरबूज रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि अनेक रोगांपासून बचाव करते.

Most Expensive Watermelon – लाखोंच्या किमतीला विकले जात आहे हे कलिंगड कसे ते जाणून घ्या

टरबूज ऊर्फ कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे.कलिंगड हे पारंपारिकपणे उन्हाळ्यात खाणे चांगले आहे असे मानले जाते कारण ते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. काही स्तोत्रांनुसार, टरबूज रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि अनेक रोगांपासून बचाव करते. कारण त्यात ९७ टक्के पाणी असते. कलिंगड तुम्ही सर्वांनीच खाल्ले असेल, उन्हाळ्यातील लोकप्रिय फळांपैकी कलिंगड हे एक फळ आहे. साधारणपणे कलिंगड २० रुपये प्रति किलो दराने मिळते. कलिंगडामध्ये अनेक बिया असल्याकारणाने कधी कधी कलिंगड खाण्याची मज्जा येत नाही किंवा यात बिया का असतात असा प्रश्न पडतो पण तुम्हाला असाच बिया न असलेला कलिंगड खायला मिळाला तर… तसेच स्वस्तात असणारे हे कलिंगड लाखो रुपयांना मिळत असेल तर..

जगात असे एक कलिंगड आहे जे लाखो रुपयांना विकले जाते. डेन्सुक ब्लॅक कलिंगड (Densuke Black Watermelon) प्रजातीचं जगातील सर्वात महागडं कलिंगड आहे. याला काळं कलिंगड (Black Watermelon) किंवा काळ टरबूज असेही म्हटले जाते. जपानच्या (Japan) होक्काइडो बेटाच्या (Hokkaido Island) उत्तरेकडील भागात हे दुर्मिळ कलिंगड आढळते. ही कलिंगडाची प्रजाती इतकी दुर्मिळ आहे की, एका वर्षात या प्रजातीचे फक्त १०० कलिंगडांची लागवड केली जाते. याच कारण म्हणजे त्याची असलेली किंमत, या कलिंगडाची किंमत खूप जास्त आहे. तसेच सर्व ठिकाणी उपलब्ध होत नाही.

साधारणपणे कलिंगड हे फळ २०-३० रुपये किलोने विकले जाते. पण हे डेन्सुक ब्लॅक कलिंगड सामान्य डेन्सुक ब्लॅक कलिंगडाप्रमाणे (Densuke Black Watermelon) बाजारात विकले जात नाही तर या कलिंगडाचा दरवर्षी लिलाव (auction) केला जातो. खरेदीदार हा कलिंगड मिळवण्यासाठी मोठी बोली लावतात. २०१९ या वर्षात या कलिंगडासाठी सर्वात महागडी बोली लावली गेली होती ही बोली ४ लाख रुपयांची लावली गेली होती . कोविड महामारीच्या काळात या कलिंगडाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. पण आजही हे कलिंगड जगातील सर्वात महाग कलिंगड म्हणून ओळखले जाते. या कालींगडमध्ये इतकं खास काय असत ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे कलिंगड दिसायला अतिशय चमकदार आणि काळ्या रंगाचं असतं. हे सामान्य कलिंगडासारखं अजिबात दिसत नाही. या कलिंगडाच्या आतील फळाचा गर कुरकुरीत असतो. हे खूप गोड असते आणि इतर कलिंगडाच्या तुलनेत यामध्ये कमी बिया असतात.

 

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version