spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आई मुलीला एका कागदाच्या सहाय्याने शिकवते आयुष्याचे धडे

एक आई आपल्या लहान मुलीला कागद हातात घेऊन काही महत्वाच्या गोष्टी शिकवते आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या आईचे कौतुक केले आहे.

लहान मुलं खूप निरागस असतात. म्हणजे काय तर ते मातीचा गोळा असतात. तुम्ही त्यांना जसा आकार देणार तसे ते घडत जातात म्हणजे शिकत जातात किंवा त्यांच्या आजूबाजूला म्हणजे कुटुंबात समाजात जे काही दिसते त्या गोष्टी ते आत्मसाद करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि त्याला चांगले भविष्य देण्यासाठी पालक सर्वतोपरी प्रयत्न करतात. पालक झाल्यानंतर जबाबदारी खूप वाढते विशेषतः मुलं लहान असली की योग्य त्यावयात त्यांना योग्य त्या गोष्टी शिकवल्या तर ते त्यांच्यासाठीच भविष्यात योग्य ठरते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ह्यात एक आई आपल्या लहान मुलीला कागद हातात घेऊन काही महत्वाच्या गोष्टी शिकवते आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या आईचे कौतुक केले आहे.

व्हिडीओमधल्या आईचं नाव ताहेर आहे. ही आई आपल्या मुलीला या हा कागद वापरून एक गोष्ट समजावण्याचा प्रयत्न करत आहे. लहान मुलगी या कागदाकडे पाहून त्याला चिडवल्यासारखे करत आहे. आई ती मुलगी जितक्या वेळा चिडवते आहे तितक्या वेळा हा कागद तिची आई चुरगळते आहे. कागद पूर्णपणे चुरगळला आहे. त्यानंतर मग आईने तो कागद पुन्हा मूळ स्वरूपात आणला. मुलीला चिडवल्याबद्दल आई ने माफी मागायला सांगितली. मागितल्यानंतरही पेपर चुरगळलेलाच होता. तो पुन्हा पहिल्यासारखा दिसून येत नाही तेव्हा आई मुलीला समजवते की तिने माफी मागितल्या नंतर कागद तसाच चुरगळेलेला आहे तो पूर्वी सारखा नाही होऊ शकत. यावरून आई ने लेकीला चांगली शिकवण दिली आहे. तसेच एखाद्याला वाईट बोलले किंवा चिडवले तर तो पुन्हा पूर्वीसारखा नाही होऊ शकत हे आईने मुलीला यातून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. हे समजल्यावर ती मुलगी आईला आपण असे पुन्हा करणार नाही असे सांगते.

https://www.instagram.com/reel/CemxprFrg8R/?igshid=YmMyMTA2M2Y=

नेटकाऱ्यानी हा व्हिडिओ पाहून आईचे कौतुक केले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. हा व्हिडीओ (the_aesthetic_side_of_hom) या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडू लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Latest Posts

Don't Miss