Mother Teresa Death Anniversary: आयुष्यभर लोकांसाठी झटणाऱ्या महान समाजसेविका मदर तेरेसा यांच्याविषयी जाणून घेऊया…

Mother Teresa Death Anniversary: आयुष्यभर लोकांसाठी झटणाऱ्या महान समाजसेविका मदर तेरेसा यांच्याविषयी जाणून घेऊया…

Mother Teresa Death Anniversary: भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित करण्यात आलेल्या समाजसेविका मदर तेरेसा यांची आज पुण्यतिथी. मदर तेरेसा यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य समाजातील लोकांच्या भल्यासाठी आणि दुःखी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी व्यथीत केलं. इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यातच त्यांनी स्वतःचा आनंद पहिला. मदर तेरेसा मूळच्या कॅथलिक होत्या परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं होत. मदर तेरेसा यांचे मूळ नाव Anjezë Gonxhe Bojaxhiu असे आहे. परंतु पुढील प्रवासातील सेवाधर्मामुळे त्यांचे ‘मदर तेरेसा’ असे नामकरण केले गेले.ऑट्टोमन साम्राज्याचा एक भाग असलेल्या स्कोप्जे येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या १८ व्या वर्षी आयर्लंडला गेल्या. त्यानंतर पुढे भारतात आल्या आणि नागरिकत्व स्वीकारून भारतीय झाल्या.

त्यांनी आजारी व गोरगरीबांची सेवा करण्यासाठी ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ नावाची संस्था स्थापन केली. नंतर या संस्थेअंतर्गत अनेक अनाथालये, रुग्‍ण चिकित्सालये, शिशुभुवन, कुष्ठरोग्यांसाठीच्या वसाहती, वृद्धाश्रम सुरू केले. कोलकात्यामधल्या अस्वच्छ गल्ल्यांनाच आपलं कार्यक्षेत्र मानून एचआयव्ही बाधित, कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या आणि क्षयारोगाने त्रस्त झालेल्या रुग्णांची देखभाल करण्यासाठी ख्रिश्चन नर्सचा संघ स्थापित केला. रस्त्यांवर पडलेल्या रुग्णांना त्या आपल्या आश्रमात घेऊन जात आणि त्यांना खाऊ पिऊ घालत असे. त्यांच्या या कार्यामुळेच १९७९ साली ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला होता. त्याचबरोबर इतरही अनेक पुरस्काराने त्यांना दिले गेले.

मदर तेरेसांच्या समाजकार्याची दखल केवळ भारतच नव्हे तर जागतिक पातळीवरही घेतली गेली. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके जाहीर झाली. त्यांपैकी पद्मश्री पुरस्कार (१९६२), मॅगसेसे पुरस्कार (१९६२), पोपचे शांतता पारितोषिक (१९७१), नेहरू पुरस्कार (१९७२), पद्मश्री देशिकोत्तमा, नॉर्वे लोकपारितोषिक (१९७९), भारतरत्न (१९८०) इत्यादी मानाचे पुरस्कार आहेत. कोलकात्यात म्हणजे त्यांच्या कर्मभूमीतच मदर तेरेसांचे निधन झाले. तसेच ४ सप्टेंबर २०१६ रोजी ‘संत’ म्हणून घोषित केले गेले.

हे ही वाचा:

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

Hasan Mushrif यांना मी सिरीयसली घेत नाही, माझ्यामागे Sharad Pawar यांचा आशीर्वाद: Samarjit Ghatge

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version