Muhurat Day Market 2022 LIVE: सेन्सेक्स ६६२ अंकांनी वाढून ५९,९६५ वर उघडला

Muhurat Day Market 2022 LIVE: सेन्सेक्स ६६२ अंकांनी वाढून ५९,९६५ वर उघडला

२०२२ च्या मुहूर्तावर बाजार सकारात्मक नोटेवर उघडला आणि सेन्सेक्स ६६२ अंकांनी उडी मारून जवळपास ६०,००० वर उघडला. निफ्टी १७,७५४ वर उघडला. दिवाळीनिमित्त मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये दिवसभर कोणतेही व्यवहार झाले नाहीत. या महिन्यातील शेअर बाजाराची ही दुसरी सुट्टी होती, पहिली सुट्टी होती ती दसऱ्याच्या दिवशी जी ५ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली होती. मुहूर्त ट्रेडिंग नवीन ‘विक्रम संवत’, भारतीय उपखंडात वापरल्या जाणार्‍या ऐतिहासिक दिनदर्शिकेची सुरुवात करतो. नवीन काही सुरू करण्यासाठी मुहूर्त शुभ मानला जातो.

दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तासासाठी शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचा कार्यक्रम पार पडला जातो. लक्ष्मीपूजनाच्या विशेष ट्रेडिंगसाठी अभिनेता अजय देवगनने उपस्थिती लावली. थॅंक गॉड आणि दृश्यम-2 च्या पार्श्वभूमीवर अजय देवगनने हजेरी लावली. आज संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत मार्केट सुरू राहणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगमधील ब्लॉक डील सेशनची वेळ सायंकाळी ५.४५ ते ६ वाजेपर्यंत होती. त्यानंतर प्री-ओपनिंग सेशन सायंकाळी ६ वाजता सुरू होऊन ते ६.०८ वाजेपर्यंत चाललं. सायंकाळी ६.१५ वाजता नॉर्मल मार्केट खुलं झालं. ते संध्याकाळी ७.१५ वाजेपर्यंत सुरू राहील. कॉल ऑक्शन सेशनचा कालावधी संध्याकाळी ६.२० ते ७.०५ वाजेपर्यंत असणार असून क्लोजिंग सेशन संध्याकाळी ७.१५ ते ७.२५ वाजेपर्यंत असेल.

परकीय गुंतवणूकदारांनी आणि भारतीय गुंतवणूकदारांनी २१ ऑक्टोबर रोजी केलेल्या गुंतवणुकीची आकडेवारी समोर आली आहे. या दिवशी परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ४३८.८९ कोटी रुपयांची खरेदी केली. तर भारतीय गुंतवणूकदारांनी या दिवशी ११९.०८ कोटी रुपयांची विक्री केली.मागील वर्षी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी मुहूर्त ट्रेडिंग पार पडलं होतं. या विशेष एक तासाच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ६० हजार अंकांचा टप्पा गाठला होता. तर निफ्टी १७,९२१ अंकांवर स्थिरावला होता. यंदाच्या वर्षात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे.

हे ही वाचा :

हुसंख्य पक्षाच्या खासदारांनी यूकेच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांना दिला होकार

‘भास्कर जाधव यांच्या हल्ल्याची सीबीआय चौकशी व्हावी’; राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदमांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version