तिरुपती बालाजी मंदिराला भेट देत मुकेश अंबानींनी दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

मंदिर वर्षानुवर्षे चांगले होत आहे आणि सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे.

तिरुपती बालाजी मंदिराला भेट देत मुकेश अंबानींनी दिली ‘इतक्या’ कोटींची देणगी

देशातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक कंपनी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्या वतीने तिरुमला तिरुपती देवस्थानम या मंदिर ट्रस्टला दीड कोटी रुपयांची देणगी दिली. तिरुमला तिरुपती देवस्थानम भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करते.

मुकेश अंबानींसह त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांची होणारी पत्नी राधिका मर्चंटही त्यांच्यासोबत भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन झाल्यावर त्यांनी या मंदिराच्या प्रांगणात उपस्थित हत्तीला भोजनही दिले आणि त्याचा आशीर्वादही घेतला.

१. ५ कोटींचे दिले दान

मुकेश अंबानींसोबत रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​संचालक मनोज मोदीही होते. अंबानींनी मंदिर ट्रस्टला दीड कोटी रुपयांची देणगी दिली. यावेळी ते म्हणाले की, मी तिरुमला येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. यासोबत ते पुढे म्हणाले की, मंदिर वर्षानुवर्षे चांगले होत आहे आणि सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे.

श्रीनाथजी मंदिरालाही दिली होती भेट…

अंबानी कुटुंब हे अतिशय धार्मिक मानले जाते. याआधी अंबानी कुटुंबाने सोमवारी राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातही दर्शन घेतले होते. तसेच मुकेश अंबानी अनेकदा कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाताना दिसून आले आहेत.

या मंदिरात आजही भगवान श्रीकृष्ण विराजमान असल्याचे मानले जाते. येथे दर्शन व पूजा केल्याने लोकांचे दुःख दूर होतात. हे पहिले मंदिर आहे जेथे भगवान कृष्णाला २१ तोफांची सलामी दिली जाते. प्रसिद्ध लेखक हमिश मॅकडोनाल्ड यांनी त्यांच्या ‘अंबानी अँड सन्स’ या पुस्तकात लिहिले आहे की, अंबानी कुटुंब मूळ बनिया कुटुंबातून आले आहे आणि त्यांचे मुख्य देवता भगवान श्रीनाथ आहेत. अंबानी कुटुंब कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी मंदिरात नक्कीच येते. या मंदिरात अंबानी कुटुंबाने आश्रमही बांधला आहे. मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी या मंदिराच्या उपाध्यक्षा आहेत. मुकेश अंबानी यांच्या कार्यालयात भगवान श्रीनाथजींची मूर्ती बसवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘या’ खेळाडूने सोडली गुजरात टायटन्सची साथ, फ्रँचायझीने ट्विटरद्वारे दिली माहिती

‘कौन बनेगा करोडपती 14’ला पहिल्यांदाच मिळाली एक महिला करोडपती स्पर्धक; प्रोमो होतोय वायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version