मस्कत-कोची एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग; प्रवाशांना तातडीने काढले बाहेर

विमानात १४४ प्रवासी आणि ६ केबिन क्रू मेंबर होते.

मस्कत-कोची एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग; प्रवाशांना तातडीने काढले बाहेर

कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या मस्कत आणि कोचीला जाणाऱ्या विमानातून धूर निघत असल्याचे दिसून आले. उड्डाण करण्यापूर्वी विमानाच्या पंखातून धूर येताना दिसला. धूर येतानाचे दृश्य निदर्शनास येताच तेथील कर्मचाऱ्यांनी योग्य ती पावलं उचलत. प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. त्यानंतर विमातून बाहेर काढलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. एअर इंडियाच्या फ्लाइट IX 442 मधून धूर आल्याची हि घटना घडली.

हा धूर विमानाच्या पंखातून येत होता. विमानात १४४ प्रवासी आणि ६ केबिन क्रू मेंबर होते. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेसंबंधी अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल असे विमानतळ आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Flipkart Big Billion Days सेल होतोय सुरु; Apple iPhone 13 बँक ऑफर आणि सवलतींसह 35,000 रुपयांच्या खाली

महाराष्ट्रातील मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत, मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version