माझी आयपीएल अध्यक्ष ललित मोदींची तब्येत पुन्हा बिघडली, कोविडमुळे रुग्णालयात केले दाखल

ललित मोदी म्हणाले की, त्यांना दोन आठवड्यांत दोनदा कोविडची लागण झाली होती.

माझी आयपीएल अध्यक्ष ललित मोदींची तब्येत पुन्हा बिघडली, कोविडमुळे रुग्णालयात केले दाखल

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आठवडाभरापासून २४ तास ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. ललित मोदींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याचा खुलासा केला आहे. ललित मोदी म्हणाले की, त्यांना दोन आठवड्यांत दोनदा कोविडची लागण झाली होती आणि त्यांना “गंभीर निमोनिया” आहे. यासोबतच त्यांनी त्याचा फोटोही जारी केला आहे.

शुक्रवारी (१३ जानेवारी) एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, गेल्या २ आठवड्यात ते दोनदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. कोविडनंतर त्यांना न्यूमोनिया झाला आहे. त्यांनी लिहिले, “२ आठवड्यात दुहेरी कोविडसह ३ आठवड्यांचा एकटेपणा, तसेच पुन्हा पुन्हा होणारा इन्फ्लूएंझा आणि गंभीर न्यूमोनिया. शेवटी दोन सुपरस्टार डॉक्टर आणि सुपर मुलासह ज्यांनी लंडनमध्ये माझ्यासाठी खूप काही केले.” त्यांच्यासह हवाई रुग्णवाहिकेतून खाली उतरलो.”

गेल्या वर्षी ललित मोदी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. जेव्हा त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबतचे नाते जाहीर केले. १४ जुलै २०२२ रोजी ललित मोदी यांनी इंस्टाग्राम पोस्टवरच सुष्मिता सेनसोबतच्या नात्याचा खुलासा करताना दोघांचे अनेक फोटो पोस्ट केले होते. मात्र, सुष्मिता सेनेने आयपीएलच्या संस्थापकासोबत डेटिंग करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. नंतर, डीपी बदलून आणि बायोमधून सुष्मिता सेनचे नाव काढून टाकून ललित मोदींनी दोघांमधील ब्रेकअपच्या बातम्यांना उत्तेजन दिले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीला मोठा धक्का, खासदारच सदस्यत्व रद्द

भारत जोडोला तात्पुरती स्थगिती, बड्या नेत्याच्या मुत्यूने काँग्रेसमध्ये व्यक्त केली हळहळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version