लवकरच सुरु होणार नॅान एसी वंदे भारत ट्रेन!

या एक्सप्रेसमुळे स्वस्त आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. या वर्षाभरात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा संकल्प रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

लवकरच सुरु होणार नॅान एसी वंदे भारत ट्रेन!

आता लवकरच पहिली नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यात येणार आहे. ही पहिली नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) दिली आहे. या एक्सप्रेसमुळे स्वस्त आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. या वर्षाभरात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा संकल्प रेल्वे मंत्रालयाने केला आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चेन्नईकडून वंदे भारत एक्सप्रेस नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात आली आहे. या नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा प्रवास अगदी आरामात, वेगवान आणि स्वस्त दरात होणार आहे.

सध्या सुरु असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा या नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेसचा रचना थोडी वेगळी असणार आहे. या नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच यामध्ये फायर अलार्म सारख्या सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत. एसी वंदे भारतपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी असेल. तर या एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किलोमीटर असणार आहे. सध्या सुरु असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किलोमीटर इतका आहे.

दरम्यान रेल्वे मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे. सध्या सुरु असलेल्या एसी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सर्वसामान्यांना परवडत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सामान्य लोकांसाठी ही नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. या नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर अगदी कमी असणार आहेत. तसेच योमध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा उपलब्ध असणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

हे ही वाचा: 

मुंबईत Mukesh Ambani यांच्यानंतर ‘या’ उद्योगपतीचं आहे सर्वात महागडं आणि मोठं घर …

Welcome 3, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, कोणते कलाकार साकारणार प्रमुख भूमिका?

गुलामगिरीची मानसिकता सोडून २०४७ मध्येच भारत विकसित होईल, Nirmala Sitharaman

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version