नरेंद्र मोदींच्या मातोश्री ‘हिराबेन मोदी’ रुग्णालयात दाखल, मोदी अहमदाबादला रवाना

नरेंद्र मोदींच्या मातोश्री ‘हिराबेन मोदी’ रुग्णालयात दाखल, मोदी अहमदाबादला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये (UN Mehta Hospital) दाखल करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) आणि राज्याचे आरोग्य मंत्री रुग्णालयात पोहोचले आहेत. २७ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraba Modi) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, हिराबेन यांनी १८ जून रोजीच त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या (Gujarat election) दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.

याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. याच निवडणुकीमध्ये हिराबेन यांनी मतदानही केलं. हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. पंतप्रधान मोदींच्या आईने वयाची शंभरी पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला होता. “मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तीमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडूनच आल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये (Delhi) बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत,” असं मोदी म्हणाले होते.

हे ही वाचा:

Dharmaveer 2 आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार, धर्मवीर – मुक्काम पोष्ट ठाणे२ लवकरच…

१०वी पास धीरूभाई अंबानी अब्जो रुपयांच्या मालक

Viral video भर वर्गात शिक्षकाने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version