spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Narendra Modi’s mother Hiraben Modi passed away नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी घेतला अखेरचा श्वास

आताची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झाले आहे. यूएन मेहता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Narendra Modi’s mother Hiraben Modi passed away : आताची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे. नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झाले आहे. यूएन मेहता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या आई हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये (UN Mehta Hospital) दाखल करण्यात आले होते. २७ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraba Modi) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हिराबेन यांनी १८ जून रोजीच त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या (Gujarat election) दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.

याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. याच निवडणुकीमध्ये हिराबेन यांनी मतदानही केलं. हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. पंतप्रधान मोदींच्या आईने वयाची शंभरी पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला होता. “मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तीमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडूनच आल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये (Delhi) बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत,” असं मोदी म्हणाले होते.

हे ही वाचा:

सर्वात मोठ्या जागतिक कॅफे इव्हेंटसपासून चॅरिटी ड्राइव्हपर्यंत, अशा ग्रँड पद्दतीने BTS Army करणार V चा वाढदिवस साजरा

Pathaan पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री, दीपिकाच्या भगव्या बिकिनीसह चित्रपटातील सीन कट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss