Nasal Vaccine नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोनाच्या ‘नेझल लसी’ची किंमत जाहीर

चीन, जपान, अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे.

Nasal Vaccine नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोनाच्या ‘नेझल लसी’ची किंमत जाहीर

चीन, जपान, अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. गेल्या आठवड्यात परवानागी देण्यात आलेली भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लशीला गेल्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून लवकरच ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लसीची किंमत १ हजार रुपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत ८०० रुपये आणि २०० रुपये जीएसटी, रुग्णालयाचे चार्ज असणर आहे.

नेझल कोरोना वॅक्सिन (Nasal Corona Vaccine) म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना ट्रायपॅनाफोबिया आहे, म्हणजेच सुईची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.

गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC कोरोना लसीला बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या वॅक्सिनची किंमत ८०० रुपये आणि जीएसटी ५ टक्के असणार आहे.

इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC कोवॅक्सीन (Covaxin) आणि कोव्हिशिल्डचे (Covishield) लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांना बूस्टर डोस म्हणून परवानगी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लस कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागिरकांना उपलब्ध होणार आहे. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात कोरोना लसीच्या एका डोसला १५० रुपये दर आकारण्याची परवानगी दिली आहे. ही रक्कम जोडून कोरोना लसीची किंमत हजार रुपये होण्याची शक्यता आहे. नेझल कोरोनो वॅक्सिन सेंट लुईस येथील वॉश्गिंटन विद्यापीठात विकसीत करण्यात आली आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-१९ लसीचा पर्याय कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १८ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजाची हक्कालपट्टी, दिली पहिली प्रतिक्रिया

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव मंजूर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रमीझ राजाची हक्कालपट्टी, दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version