spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

National Handloom Day 2024: ७ ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस जाणून घ्या सविस्तर माहिती…

राष्ट्रीय हातमाग दिवस हा २०१५ नंतरच साजरा करण्यास सुरुवात झाली. भारत सरकारने ७ ऑगस्ट २०१५ रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण देशभरात हा दिवस आता विविध प्रकारचे कार्यक्रम आणि थीम ठेवून साजरा केला जातो.

हातमाग विणण्याची परंपरा (Tradition) भारत देशात वर्षानुवर्षे चालत आली आहे. हातमाग विणकरांची भारताची अर्थव्यवस्थता (Economy)सुधारण्यास मोठा हातभार आहे. भारत देशात हातमाग उद्योगाला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. हातमाग विणकर समुदायाचा सन्मान करण्याच्या हेतूने आणि हातमाग व्यवसायाला त्याचे वैभव पुन्हा परत मिळावे यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन ७ ऑगस्ट २०१५ रोजी चेन्नई (Chennai )येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात आले.

भारत देशात विविध प्रांतांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात हरियाणा (Hariyana) पाणीपत हे शहर ‘हॅण्डलूम हब ऑफ इंडिया’ (Handloom Hub of India)म्हणून ओळखलं जातं. पैठण (Paithan) शहराची पैठणी तर सर्वदूर प्रसिद्ध आहे त्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत आहे. भारत देशातील असंख्य कलांमधून हातमाग हि एक अनोखी कला आहे. इतक्या सर्व यंत्रांची उत्पत्ती झाल्यानंतरही हातमाग उद्योग अजूनही सुरु आहे, कारण हि भारत देशाची प्राचीन कला आणि परंपरा आहे. भारतात तयार होणाऱ्या या वस्त्रांना परदेशातही मोठी मागणी आहे. ब्रिटिशकाळापासून भारतातून अनेक गोष्टी निर्यात होत होत्या यात मसाल्याचे पदार्थ आणि हातमाग व्यवसायातून तयार होणारे वस्त्र हे सर्वात मोठ्या पप्रमाणात केले जात होते.

७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध स्वदेशी चळवळ सुरू केली होती. त्यानंतर २०१५ सालापर्यंत म्हणजेच ११० वर्षे होऊन गेल्यांनतर हा दिवस ७ ऑगस्ट २०१५ रोजी पुन्हा नव्याने ओळखला जाऊ लागला.

हे ही वाचा:

Uddhav Thackeray यांचा आज दिल्ली दौरा होणार सुरु; दरम्यान भेटणार ‘या’ महत्वाच्या नेत्यांना

आमदार अपात्रतेबाबत Supreme Court मध्ये होणार सुनावणी ; दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss