spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

National Punch Day: जाणून घ्या अमेरिकेत प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय पेयाची कहाणी

पंच सर्व्ह करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पात्राला पंच बाऊल म्हणून संबोधले जाते.

आज २० सप्टेंबर. आजच्या दिवशी युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेत नॅशनल पंच डे म्हणजेच राष्ट्रीय पंच दिवस साजरा केला जातो. आता हा पंच मारामारीतला पंच नव्हे तर पंच हे अमेरिकेतील एक लोकप्रिय पेय आहे. आणि या पेययाचा शोध लागला म्हणून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण, आता तुम्ही म्हणाल की त्यांच्या या नॅशनल पंच डे आणि आपला काय संबंध? तर आपला संबंध आहे. या पेययाचा इतिहास पाहिला तर यात भारताचा नाव अगदी आवर्जून घेतलं जातं. त्यामुळे आज आपण जाणून घेणार याच दिवसाच्या इतिहासाबाबत.

पंच हे फार जुने नाव आहे आणि नावाप्रमाणे हे पेय देखील तितकेच जुने आहे. पहायला गेलं तर पंच हे एक असे पेय आहे जे पूर्णपणे ना कोणत्याही सोड्यापासून बनवलं जातं, ना कोणत्याही फळाच्या रसापासून तसेच पंच या पेययाचे कॉकटेल या या पेय गटात सुद्धा समावेश होत नाही. त्यामुळे पंच हे एक असे पेय आहे जे विविध पदार्थांच्या मिश्रणातून तयार केले जाते.

आता एक नजर टाकुया पंचच्या इतिहासावर, तर ‘पंच’ या शब्दाचा पहिला वापर १६३२ पर्यंत केला गेला होता. त्यावेळी हा शब्द पंचलाइन म्हणून वापरला जायचा. पंच ड्रिंकच्या उत्पत्तीबद्दल बोलायचं झालं तर १६०० च्या आसपास भारतात पंचचा उगम झाला होता आणि या पेययाला जगभर प्रसिद्धी मिळवून देण्याचं सगळं श्रेय जातं ते ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या खलाशांना. ज्यांनी त्यांच्या प्रवासाच्यावेळी पंचचा प्रसार केला.

‘पंच’ हा शब्द हिंदी भाषेतील ‘पंच’ या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ पाच असा होतो. मूलतः, पंच पाच घटकांपासू बनविले जायचे, ज्यात अल्कोहोल, साखर, लिंबू, पाणी आणि चहा किंवा मसाले यांचा समावेश असायचा आणि म्हणूनच त्याला पंच म्हटलं जायचं. या पेययाच्या नावाबाबत असणारा समज म्हणजे पंच हा शब्द इंग्रजीतील पंचोन या शब्दापासून आला आहे, जो जहाजावर अल्कोहोल वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विशिष्ट आकाराच्या बॅरल्सचे व्हॉल्यूमेट्रिक वर्णन करतो.

१६३८ मध्ये, जोहान अल्ब्रेक्ट डी मँडेस्लो नावाच्या तरुण जर्मन व्यक्तीने जगातील सर्वात जुन्या पंचची पाककृती लिहिली. १७ व्या शतकापर्यंत हे पेय इंग्लंडमध्ये लोकप्रिय होऊ लागले जे ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तेथे आणले आणि तेथून ते उर्वरित युरोपियन देशांमध्ये आणि नंतर जगभर पसरले.

त्या काळात, बहुतेक पंच हे वाइन किंवा ब्रँडी बेससह बनवले जायचे. पण १६५५ च्या सुमारास, जमैकन-निर्मित रम वापरात आली आणि “आधुनिक” पंच उदयास आले. १६७१ पर्यंत, पंच विकणारी विविध दुकान इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आली.

 

पंच हे पेय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

नॉन-अल्कोहोलिक पंच हे विशेषतः लहान मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी तयार केले जाते. जे फळांचा रस, पाणी, साखर किंवा मध यांसारख्या पदार्थांपासून बनविले जाते. ज्यात अनेकदा सोड्याचाही समावेश असतो. तर दुसरीकडे महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी आणि मद्यप्रेमींसाठी “ग्रेन पंच”, “जंगल-ज्युस” अशा विविध अल्कोहोलयुक्त पंच बनवले जाते. पंच हे मुख्यत्वे एका रुंद बाऊलमधून सर्व्ह करण्याची पद्धत आहे आणि पंच सर्व्ह करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पात्राला पंच बाऊल म्हणून संबोधले जाते

पूर्वी पंच हे पेय खूप प्रसिद्ध होते. पण, सध्याच्या काळात पंच हे पेय फक्त काही ठराविक दिवसांच्या दिवशी किंवा समारंभाच्या दिवशी प्यायले जाते. म्हणूनच पार्ट्यांमध्ये, विवाहसोहळ्यांमध्ये आणि इतर उत्सवांमध्ये पंच हे पेय पेयाच्या टेबलावर केंद्रस्थानी दिसून येते. पण, सध्याच्या काळात लोकांनी पुन्हा एकदा या पेययाचा दैनंदिन आहारात समावेश करावा म्हणून दरवर्षी २० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पंच दिवस साजरा केला जातो.

हे ही वाचा:

महागाई विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार स्थापन करणार नवी समिती; चंद्रकांत पाटील असणार अध्यक्ष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss