National Sports Day 2024: राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागचे कारण माहीत आहे का?

देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूंचा जन्म दिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिले. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते.

National Sports Day 2024: राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यामागचे कारण माहीत आहे का?

भारत देशाला एक मोठी क्रीडा परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनेक खेळांमध्ये आपलं प्राविण्य जगाला दाखवून दिलं आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक, क्रिकेट विश्वचषक, हॉकी, बुद्धिबळ, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या खेळात आज भारत अग्रेसर आहे. याच खेळांमधून अनेक मोठे खेळाडू घडले आणि भारताचा ध्वज फडकावला. भारतातली हीच क्रीडा परंपरा जपण्यासाठी २९ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे नाव भारतातल्या प्रत्येक क्रीडाप्रेमींना ठाऊक असेलच. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूंचा जन्म दिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिले. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरी करण्यात येते.

१९२८, १९३२, आणि १९३६ अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळे भारतानं सुवर्णपदावर आपली मोहोर उमटवली होती. त्यांना १९५६ साली सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले होते. पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांची २९ ऑगस्ट रोजी जयंती असते. याच दिवशी खेळ आणि खेळाचं आपल्या जीवनातील महत्त्व देशातील प्रत्येक नागरिकाला पटवून देण्यासाठी २०१२ सालापासून भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीसोबत त्यांची बढती होत राहिली. लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर या पदापर्यंत त्यांनी झेप घेतली. मेजर ध्यानचंद यांच्यातील कौशल्याबाबत बोलताना स्टिकला चेंडू जणू चिटकलेला असायचा असे वर्णनही केले जाते.

भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या ‘खेलरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं असणार आहे. त्यांच्या या अतुलनीय कार्याच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो.

हे ही वाचा:

शिवस्मारक या सांस्कृतिक ठेव्याला राजकीय गालबोट; राणे समर्थकांकडून पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा

नारायण राणेंनी मविआच्या कार्यकर्त्यांना दिली धमकी, “… एकेकाला ठेचून मारुन टाकेन”

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version