spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

National Suicide Prevention Day: राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करण्याचे जाणून घ्या महत्त्व….

National Suicide Prevention Day: जगभरात आत्महत्या हा एक गंभीर विषय बनला आहे. त्यासाठीच राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी १० सप्टेंबर रोजी आत्महत्या प्रतिबंधा विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्यावरील लावले गेलेले कलंक कमी करण्यासाठी पाळला जातो. सध्या आत्महत्या हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे, दरवर्षी ८००,००० हून अधिक लोकांचा मृत्यू होतो, जे आत्महत्येतून घडलेले असतात. एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये ( United States) , दर ११ मिनिटांनी एक व्यक्ती आत्महत्या करते.

आत्महत्या करणे ही बाब टाळता येण्यासारखी आहे आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्यांसाठी ही अनेक प्रकारच्या मदत उपलब्ध आहे याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. व्यक्ती, समुदाय आणि संस्थांनी गरजूंसाठी एक सहाय्यक वातावरण तयार करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी हे आवाहन आहे. आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींच्या बद्दल देखील खोलवर रुजलेले गैरसमज आपल्या समाजात आहेत.

आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येची प्रमुख कारणे समोर आली आहेत. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते. त्यासाठीच २००३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आत्महत्या रोखण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन आवश्यक आहे ज्यामध्ये शिक्षण आणि जागरूकता, मानसिक आरोग्य संसाधने, समुपदेशन, समुदाय समर्थन,संकटात हस्तक्षेप समावेश असणे गरजेचे आहे. हा वार्षिक जागरूकता दिवस इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन (Interbational Association for Sucide Prevention- IASP) द्वारे आयोजित केला जातो. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा आत्महत्येबद्दल जागरुकता निर्माण करण्याची आणि ती रोखण्यासाठी प्रयत्नांना चालना देण्याची संधी म्हणून साजरा केला जातो. आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन हे देखील आत्महत्या टाळण्या साठी एक महत्वाची गोष्ट ठरू शकते. परिवर्तन संस्थेमार्फत चोवीस तास चालणारी आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन( 7412040300) चालवली जाते.

हे ही वाचा:

माझं डोकं फिरवू नका, तुमच्यात एवढी खुमखूमी असेल तर… राऊतांची Manoj Jarange Patil यांच्यावर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये; ‘या’ चार नेत्यांवर सोपवली जाणार महत्त्वाची जबाबदारी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss