नौदलाची ताकद वाढणार …., नवीन ५ जहाजांच्या प्रस्तावाला मंजुरी

भारतीय नौसेनेची (Indian Navy) ताकद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक नवं नवीन तरतुदी केल्या जात आहेत.

नौदलाची ताकद वाढणार …., नवीन ५ जहाजांच्या प्रस्तावाला मंजुरी

भारतीय नौसेनेची (Indian Navy) ताकद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक नवं नवीन तरतुदी केल्या जात आहेत. यासाठी २० कोटी रुपायची गुंतवणूक सुरक्षा मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. मेक इन इंडियाचा योजनेमधून केंद्र सरकार नौसेनेसाठी पाच फ्लीट सपोर्ट जहाजे (Fleet Support Ship) बनवण्यासाठी मान्यता देणार आहे. ही समुद्री जहाज तयार झाल्यानंतर समुद्रात असलेल्या नौदलासाठी अन्न ,इंधन, आणि शस्त्र भरण्यासाठी याची मदत होईल असे सांगितले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी २० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये ५ मोठ्या आणि विकसित जहाजांची बांधणी करणार आहे. विशाखापट्टम येथील सरक्षण मंत्रालयाच्या हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड यांचा द्वारे ५ जहाज बनवली जाणार आहेत. जहाज बनवण्यासाठी केंद्र सरकारने हिंदुस्थान शिपयार्ड कंपनीची निवड करण्यात आली आहे. जहाज बनवण्याचा या कामासाठी हिंदुस्थान शिपयार्ड ८ वर्षांपासून लक्ष ठेवून आहे. पुढील ८ वर्षात हि कंपनी जहाज पूर्ण करून देणार आहे. तसेच यातील प्रत्येक जहाजाचे वजन हे ४५,००० एवढे असणार आहे. एएनआयलाला मिळालेल्या माहिती नुसार , केंद्र सरकारने १६ ऑगस्ट (बुधवार) रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या ५ च जहाजांमुळे छोट्या मोठ्या जहाज बांधणीसाठी मदत होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच हि लढवू जहाज भारतीय नौदलाचा आधार बनणार असल्याचे सांगितले आहे. हि स्वादेशी बनावटीची जहाज समुद्रमध्ये खूप मोठी भूमिका निभावणार आहेत. हि जहाज लढाई मध्ये समुद्रातील अन्न, इंधन,दारुगोळा, आणि शस्त्र इत्यादीसाठी खूप महत्वाची ठरणार आहेत. या जहाजाचा बांधणीमुळे हजारो लोकांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. यामुळे नौसेनेची ताकद वाढणार आहे.

भारतीय नौसेनेत २६ नवीन लढाऊ विमान तयार होऊन येणार आहेत. भारतनाने फ्रांस कडून २६ राफेल आणि ३ 3 फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याचा प्रस्तावाला मान्यता दिली गेली आहे. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह याचा अध्येक्षतेखाली या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या नवीन लढाऊ जहाजनमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.

हे ही वाचा:

Andheri तील धक्कादायक घटना आली समोर, गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू तर…

पुणे दहशतवादी प्रकरणात सुरक्षा संस्थांनी केला मोठा खुलासा

तुळजाभवानीच्या दर्शनाला ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version