तब्बत २६ वर्षाची NDTV सोबतची साथ सोडली, राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच रवीश कुमार यांचे भावुक ट्विट

तब्बत २६ वर्षाची NDTV सोबतची साथ सोडली, राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच रवीश कुमार यांचे भावुक ट्विट

NDTV चे अँकर आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यम विश्वात आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अदानी समूहाने (Adani Group) एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी एनडीटीव्हीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही राजीनामा दिल्याची माहिती एनडीटीव्हीकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांच्या फॉलोअर्सकडून सोशल मीडियावर एनडीटीव्ही व्यवस्थापनाचा निषेध केला जात आहे. त्यात आता राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच रवीश कुमार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

रवीश कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटलं

प्रिय जनता, तुम्ही माझ्या सोबत आहात. तुमचे प्रेम हीच माझी संपत्ती आहे. मी तुमच्याशी खुप काळ संवाद साधला आहे. यूट्यूब चॅनेल हा माझा नविन मार्ग आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलवर. हा माझा नवीन पत्ता आहे. गोडी मीडियाच्या गुलामगिरीविरुद्ध सर्वांनाच लढायचे आहे.
तुमचा रवीश कुमार… अशा आशयाचे ट्विट रवीश कुमार यांनी केले आहे.

हेही वाचा : 

“छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केंद्र व राज्याकडून बक्षिस?”, मंत्री लोढांच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप

रवीश कुमार हे मोदी सरकारचे कडक टीकाकार

रवीश कुमार हे देशात मोदी सरकारचे कडक टीकाकार म्हणून ओळखले जातात. रवीश कुमार त्यांच्या प्राइम शोमध्ये मोदी सरकार आणि भाजपवर सर्वाधिक टीका करताना दिसले. रवीश यांच्या विरोधकांची सर्वात मोठी तक्रार ही आहे की ते भाजप आणि मोदी सरकार व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्ष आणि सरकारविरोधात टीकात्मक भूमिका घेत नाहीत. रवीश कुमार मोदी सरकारचे गुणगान करणाऱ्या मीडिया संस्थांना गोडी मीडिया म्हणतात. रवीशच्या या कमेंटमुळे तो सोशल मीडियावर टीकेला बळी पडत आहे.

World Aids Day 2022 : आजाराला न घाबरता सामोरे जा, HIV आणि AIDS बद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक एड्स दिन’

Exit mobile version