NEET-UG परीक्षेची तारीख जाहीर

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट -२०२३' (NEET-UG Exam 2023) राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या (National Eligibility Cum Entrance Test) तारीख जाहीर करण्यात आली आहे.

NEET-UG परीक्षेची तारीख जाहीर

NEET-UG Exam Date 2023 : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट -२०२३’ (NEET-UG Exam 2023) राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेच्या (National Eligibility Cum Entrance Test) तारीख जाहीर करण्यात आली आहे. ७ मे २०२३ रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

एनटीए लवकरच नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करेल. NEET UG 2023 चे नोंदणी अर्ज या अधिकृत वेबसाइट- nta.ac.in, neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. NEET 2023 चा अर्ज जारी झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थी अर्ज शुल्क भरून अधिकृत वेबसाइटद्वारे नोंदणी करू शकतील. नीट यूजी NEET UG परीक्षा नमुना, अभ्यासक्रम, अर्ज तपशील, पात्रता आणि पात्रता निकष, इतर माहितीसह संपूर्ण तपशील NTA कडून अधिसूचनेद्वारे जारी करण्यात येईल. NEET UG परीक्षेत बसण्यासाठी किमान वयोमर्यादा १७ वर्षे असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता १२ वी किंवा संबंधित विभागातील परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी नीट परीक्षेला बसण्यास पात्र आहे. याशिवाय विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात गणित किंवा इंग्रजीसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैव तंत्रज्ञान आणि इतर कोणत्याही पर्यायी विषयांचा समावेश असावा.

नीट यूजी परीक्षेची (NEET-UG Exam Date) तारीख लवकर जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. नीटसोबतच NTA ने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE Main आणि विद्यापीठ प्रवेश परीक्षा CUET UG चे वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. JEE मेन सत्र १ ची परीक्षा जानेवारी आणि सत्र २ ची परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होईल. तसेचर CUET मे-जून महिन्यात घेण्यात येणार आहे.

जेईई मेनसाठी नोंदणी आधीच सुरू झाली आहे. दरम्यान NTA ने इतर परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. लवकरच रजिस्ट्रेशनच्या तारखा जाहीर करण्यात येतील.

हे ही वाचा : 

रेल्वे व्यवस्थापनाने दिला महत्वाचा सल्ला, नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा

मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबईत भाजपचं ‘माफी मांगो’ आंदोलन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version